• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी फाउंडेशनच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शुभेच्छांचा वर्षाव

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 11, 2026
in जळगाव जिल्हा
0
डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी फाउंडेशनच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शुभेच्छांचा वर्षाव

जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या तथा भाजपच्या जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. गोदावरी फाउंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये डॉ. केतकी पाटील यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.

गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी शैक्षणिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सकाळी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, गोदावरी आयएमआर महाविद्यालय येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला डॉ. केतकी पाटील यांचे वैद्यकीय महाविद्यालयातर्फे औक्षण करून स्वागत करण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी डॉ. केतकी पाटील यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. डॉ. केतकी पाटील सभागृहात वाढदिवसानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाला चेअरमन तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, फाउंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधीष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर, डॉ. माया आर्विकर, आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, होमीओपॅथी महाविद्यालयाचे डॉ. विद्यानंद आठवले, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर, डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद बिरादर, गोदावरी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य शैलेश तायडे, पूनमचंद सपकाळे, आयुर्वेद महाविद्यालयाचे रजीस्ट्रार चेतन चौधरी, शिक्षण व संशोधन संचालक अशोक चौधरी, लेखापाल योगेश पाटील, सुनिल बोंडे, विकास बेंडाळे, किशोर झांबरे यांच्यासह रूग्णालयातील डॉक्टर्स, परिचारीका व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

याप्रसंगी वाढदिवसानिमित्त डॉ. केतकी पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता  डॉ. प्रशांत सोळंके यांनी मनोगत व्यक्त करीत डॉ. केतकी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी एकल गीत सादर केले. तसेच डॉ. एन.एस. आर्विकर, डॉ. माया आर्विकल यांनी ड्युएट गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संस्कृती भिरूड, डॉ. प्राची यांनी केले. तर आभार कु. किवा पाटील हिने मानले. कार्यक्रमानंतर गोदावरी फाउंडेशन संचलित सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचार्‍यांनी डॉ. केतकी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समुह नृत्य, एकल नृत्य, गीत गायन अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली. विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी केलेल्या बहारदार नृत्याचे मान्यवरांनी कौतुक केले.

गोदावरी एक संस्कार अन् विचार – डॉ. केतकी पाटील
हा पहिला वाढदिवस आहे, ज्याला गोदावरी आजी नाही. गोदावरी हे केवळ एक नाव नसून तो एक संस्कार अन् विचार असल्याचे मत डॉ. केतकी पाटील यांनी व्यक्त केले.

गोदावरी हेल्थ सिटी अंतर्गत ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी भविष्य घडवितांना विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. एक ट्रेंड म्हणून निर्णय घेऊ नका. सकारात्मक राहून नवा ट्रेंड तयार करा. पुस्तकी ज्ञानासोबत व्यावहारिक ज्ञानही जोपासा. आपण एका नोबेल पेशात काम करतो. त्याला अनुसरून गोदावरी आजीचे संस्कार आणि विचार समाजापर्यंत पोहोचवा असे आवाहन डॉ. केतकी पाटील यांनी केले.

डॉ. केतकी हे गोदावरीचे उज्वल भविष्य- डॉ. उल्हास पाटील
गोदावरी अंतर्गत उभ्या राहिलेल्या संस्थांच्या मागे गोदावरी आई आणि मोठे भाऊ सुभाषदादा यांचे आशीर्वाद आहे. आता जेन-झी सध्या चर्चेत आहे. त्यामुळे नेतृत्व हस्तांतरीत करण्याची वेळ आली आहे. डॉ. केतकीचे भविष्य उज्वल असून ती मागे वळून पाहणार नाही असा विश्वास व्यक्त करीत तू मेरी जिंदगी है हे गीत चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांनी सादर केले.


 

Next Post
एक पेड़ पापा के नाम’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; ५० वृक्षांचे रोपण

एक पेड़ पापा के नाम’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; ५० वृक्षांचे रोपण

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add