• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दोन महिन्यांत ८,५५२ रुग्णांची तपासणी; ६८९ शस्त्रक्रिया यशस्वी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 9, 2026
in आरोग्य
0
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या मोतीबिंदूमुक्त यावल तालुका या विशेष अभियानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. एकूण ८ हजार ५५२ रुग्णांची ओपीडी तपासणी करण्यात येवून ६८९ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.

१० जूनपासून सुरू झालेल्या या मोहिमेमुळे यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील हजारो नागरिकांना त्यांच्या गावातच दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध झाली असून मोतीबिंदूमुळे होणारे अंधत्व रोखण्यासाठी प्रभावी पाऊल उचलले गेले आहे.जागतिक दृष्टिदान दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या अभियानांतर्गत यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

शिबिरांमध्ये डोळ्यांच्या आजारांसह इतर विविध आजारांचीही तपासणी करण्यात येत असून आवश्यकतेनुसार तज्ज्ञांकडून उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन दिले जात आहे.अभियानाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत एकूण ८ हजार ५५२ रुग्णांची ओपीडी तपासणी करण्यात आली आहे. यापैकी २ हजार ९२२ रुग्णांना आयपीडीमध्ये दाखल करून उपचार देण्यात आले.

तपासणीदरम्यान मोतीबिंदू व इतर नेत्रविकार निदर्शनास आलेल्या रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आतापर्यंत ३७९ मेजर आणि ३१० मायनर अशा एकूण ६८९ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.या अभियानाचा सर्वाधिक लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू व ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. गावोगावी जाऊन केलेल्या तपासण्यांमुळे अनेक रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान सुरुवातीच्या टप्प्यातच झाले असून वेळेत उपचार मिळाल्याने अनेकांना पुन्हा स्पष्ट दृष्टी प्राप्त झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येत आहे.

या अभियानासाठी डॉ. एन. एस. आर्विकर व डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. डॉ. नि. तु. पाटील, डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयुरी निलावड, डॉ. निखिल चौधरी, डॉ. शुभम भारसाकळे, डॉ. जतिन बाविस्कर, डॉ. उर्मी गायकवाड, डॉ. अनिष कांदळगावकर, डॉ. अभिजीत काकड, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. किर्ती महाजन, डॉ. ऋतुजा चव्हाण, डॉ. रिया गोरे, डॉ. गौरव पाटील, डॉ. वैष्णव व्यवहारे आणि डॉ. अश्विनी काकडे हे डॉक्टर रुग्णसेवेसाठी कार्यरत आहेत.

यावल तालुक्यातील प्रत्येक गरजू नागरिकापर्यंत नेत्रसेवा पोहोचवून मोतीबिंदूमुळे होणारे अंधत्व पूर्णतः रोखणे आणि मोतीबिंदूमुक्त यावल तालुका हे उद्दिष्ट साध्य करणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. नागरिकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे ही मोहीम आगामी काळात आणखी व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.


 

Next Post
‘बंदे में है दम’: कस्तुरबा सभागृहात गांधीविचारांचा रंगला कलात्मक आणि वैचारिक सोहळा

'बंदे में है दम': कस्तुरबा सभागृहात गांधीविचारांचा रंगला कलात्मक आणि वैचारिक सोहळा

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add