• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘बंदे में है दम’: कस्तुरबा सभागृहात गांधीविचारांचा रंगला कलात्मक आणि वैचारिक सोहळा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 10, 2026
in जळगाव जिल्हा
0
‘बंदे में है दम’: कस्तुरबा सभागृहात गांधीविचारांचा रंगला कलात्मक आणि वैचारिक सोहळा

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव सारख्या शहरात गांधीचा शोध घेणारा असा कार्यक्रम अनुभवायला मिळाला हा अपूर्व असा थक्क करणारा अनुभव आहे. असे प्रतिपादन हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष शंकर कुमार सन्याल, सुप्रसिद्ध लेखक सुधेंद्र कुलकर्णी यांनी केले. हरिजन सेवक संघाच्या राष्ट्रीय परिषदेनिमित्त परिवर्तन जळगाव निर्मित ‘बंदे में है दम’ या कार्यक्रमाचे आयोजन गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते.

या संगीतमय कार्यक्रमाने जैन हिल्स येथील कस्तुरबा सभागृहातील रसिकांना दीड तास मंत्रमुग्ध केले. संत कबीरांपासून संत तुकारामांपर्यंतच्या संतपरंपरेचा गांधीविचारांशी साधलेला सुरेल संवाद, गांधीजींच्या जीवनातील ज्ञात-अज्ञात प्रसंग आणि सत्याग्रहाच्या प्रवासाचे प्रभावी निवेदन यामुळे कार्यक्रमाला वैचारिक आणि कलात्मक उंची लाभली.

ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांच्या निवेदनातून साकारलेल्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगात प्रभावी निवेदन आणि अर्थपूर्ण गीतांची सुरेख गुंफण करण्यात आली. राजकारण, द्वैत-अद्वैत,बुद्ध तत्वज्ञान , जैन तत्वज्ञान , संत नामदेव, संत तुकाराम आणि कबीर, बहिणाबाई यांच्या विचारविश्वाचा गांधीजींच्या जीवनदृष्टीशी साधलेला अनोखा संगम रसिकांसमोर उलगडला. ‘रघुपती राघव राजाराम’, ‘वंदे मातरम्’, ‘भेटी लागे जीवा’, ‘वैष्णव जन तो’, ‘विठ्ठल नामाचा रे टाहो’, ‘मोको कहा धुंडे रे बंदे, ‘दे दे हमें आज़ादी’, ‘अल्ला तेरो नाम’ आणि ‘ऐसी लागे लगन मीरा हो गयी मगन’ आदी रचनांनी सभागृहात चैतन्य निर्माण केले.

सत्य आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या कविता व रचनांनी कार्यक्रमाला सामाजिक आशयाची धार दिली. निवेदनातून शंभू पाटील यांनी गांधीजींचे शिक्षण, दक्षिण आफ्रिकेतील रेल्वेतील अवमानाचा प्रसंग, स्वराज्याची संकल्पना, गांधी-विनोबा विचारांतील एकात्मता तसेच महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील पुणे कराराचा ऐतिहासिक संदर्भ प्रभावीपणे मांडला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठेपण अधोरेखित केले. त्यामुळे हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम न राहता इतिहास, विचार, तत्वज्ञान आणि संगीत यांचा मनोहारी त्रिवेणी संगम ठरला.

कार्यक्रमातील कलाकार गोविंद मोकाशी, श्रद्धा पुराणिक-कुलकर्णी, सुदिप्ता सरकार, डॉ सोनाली महाजन, अंजली धुमाळ, वरुण नेवे, दर्शन गुजराथी, अक्षय नेहे, अक्षय दुसाने, रोहित बोरसे, यश महाजन, शुभार्थी कुलकर्णी होते. या कार्यक्रमच दिग्दर्शन नारायण बाविस्कर व मंजुषा भिडे यांनी केले आहे, हर्षल पाटील व विशाल कुलकर्णी हे निर्मिती प्रमुख होते. तांत्रिक बाजू राहुल निंबाळकर, मंगेश कुलकर्णी व गणेश सोनार यांनी सांभाळली.


 

Next Post
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास ३ वर्षे सश्रम कारावास
गुन्हे

अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास ३ वर्षे सश्रम कारावास

November 25, 2026
कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!
जळगाव जिल्हा

कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!

November 25, 2026
ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई
क्रिडा

ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई

November 25, 2026
शेतीच्या वादातून व्यापाऱ्याचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; मृतदेह बहुळा नदीत फेकला
Uncategorized

शेतीच्या वादातून व्यापाऱ्याचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; मृतदेह बहुळा नदीत फेकला

November 25, 2026
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भागपुर उपसा सिंचन प्रकल्पाची  पाहणी
जळगाव जिल्हा

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भागपुर उपसा सिंचन प्रकल्पाची  पाहणी

November 25, 2026
होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा; नर्सिंग विद्यार्थ्यांना आवाहन
Uncategorized

होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा; नर्सिंग विद्यार्थ्यांना आवाहन

November 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add