• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील यशस्वी शस्त्रक्रिया

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 6, 2026
in आरोग्य
0
महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

जळगाव, (प्रतिनिधी) : तब्बल साडेनऊ किलो वजनाची गाठ काढून ५७ वर्षीय महिलेला नवजीवन देण्याची यशस्वी कामगिरी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ज्ञ शल्यचिकित्सकांनी केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पोटदुखीचा त्रास सहन करणार्‍या या महिलेवर करण्यात आलेल्या जटिल शस्त्रक्रियेमुळे तिची प्रकृती आता चांगली असून पोटदुखी पूर्णपणे दूर झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील भिली येथील ५७ वर्षीय महिलेला गेल्या तीन महिन्यांपासून सतत पोटात दुखणे, पोटाचा आकार वाढणे तसेच दैनंदिन हालचाली करताना त्रास जाणवत होता. सुरुवातीला सामान्य आजार समजून उपचार घेतल्यानंतरही त्रास कमी झाला नाही. अखेर अधिक तपासणीसाठी तिला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात शल्यचिकीत्सा विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शल्यचिकीत्सक डॉ. चैतन्य पाटील यांनी महिलेची सविस्तर तपासणी केली. त्यानंतर सीटी स्कॅन करण्यात आला. या तपासणीत गर्भपिशवीच्या डाव्या बाजूच्या अंडाशयावर (लेफ्ट ओव्हरी) मोठ्या आकाराचा ट्युमर असल्याचे निदान झाले.

वाढलेल्या गाठीमुळे आतड्यावर मोठ्या प्रमाणात दबाव येत होता. त्यामुळे रुग्णाला सतत वेदना होत होत्या. गाठीचा आकार आणि स्थिती लक्षात घेता तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.तज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉ. चैतन्य पाटील यांच्या पथकाने अत्यंत काळजीपूर्वक ओपन ट्युमर एक्सिशन ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.

शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या पोटातून तब्बल साडेनऊ किलो वजनाची गाठ सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली. गाठीचा मोठा आकार आणि शरीरातील महत्त्वाच्या अवयवांच्या जवळ असलेले स्थान लक्षात घेता ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती. मात्र डॉक्टरांच्या अनुभवामुळे आणि अत्याधुनिक सुविधांमुळे ही शस्त्रक्रिया कोणतीही गुंतागुंत न होता यशस्वी झाली.

शस्त्रक्रियेनंतर महिलेस अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवून तिच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. डॉ. आदित्य पाटील, डॉ. अनुष्का साने, डॉ. प्रणव शेवाळे, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. शितल, डॉ. सोनाली आणि परिचारीका यांच्या अथक प्रयत्नाने महिलेचे प्राण वाचले. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तीन दिवसांत तिच्या पोटातील वेदना पूर्णपणे कमी झाल्या असून ती आता व्यवस्थित चालणे-फिरणे आणि आहार घेणेही सुरू केले आहे.

▪️अंडाशयावरील गाठी सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे न दाखवता हळूहळू वाढू शकतात. त्यामुळे पोट सतत फुगणे, पोटदुखी, भूक कमी लागणे किंवा वजनात बदल जाणवत असल्यास दुर्लक्ष करू नये. वेळेत तपासणी केल्यास अशा आजारांवर प्रभावी उपचार शक्य होतात. या रुग्णाच्या बाबतीत गाठ मोठ्या आकाराची असली तरी योग्य नियोजन, अनुभवी शल्यचिकित्सकांचे कौशल्य आणि आधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
– डॉ. चैतन्य पाटील, शल्यचिकीत्सक, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.


 

Next Post
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

ताज्या बातम्या

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन
जळगाव जिल्हा

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन

September 20, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add