• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 5, 2026
in आरोग्य
0
जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम

जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील प्रसूती व स्त्रीरोग परिचर्या विभागाच्या वतीने १ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताह उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यावर्षीची संकल्पना निरोगी व शाश्वत जीवनाच्या सुरुवातीसाठी स्तनपान : प्रभावी उपक्रम अधिक बळकट करूया अशी असून स्तनपानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध शैक्षणिक, सर्जनशील आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सप्ताहाची सुरुवात १ ऑगस्ट रोजी उद्घाटन समारंभ आणि विषय परिचयाने झाली. या कार्यक्रमात स्तनपानाचे माता व बालकांच्या आरोग्यासाठी असलेले महत्त्व तसेच शाश्वत आणि निरोगी जीवनासाठी स्तनपानाची भूमिका याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.यानंतर विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ३ ऑगस्ट रोजी पोस्टर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्तनपानाविषयी माहितीपूर्ण आणि आकर्षक पोस्टर्स सादर करून जनजागृतीचा संदेश दिला.

४ ऑगस्ट रोजी विषयाधारित रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कलात्मकतेतून स्तनपानाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.५ ऑगस्ट रोजी घोषवाक्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना स्तनपानाविषयी प्रभावी संदेश देण्याची संधी मिळणार आहे. ६ ऑगस्ट रोजी स्तनपान जनजागृती व समर्थन या विषयावर रोल प्ले सादर केले जाणार आहेत. यामधून स्तनपानासंदर्भातील सामाजिक, आरोग्यविषयक आणि कौटुंबिक पैलूंवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.

सप्ताहाचा समारोप ७ ऑगस्ट रोजी आयोजित विशेष परिसंवाद, समारोप समारंभ आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमाने होणार आहे. विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे.महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. विशाखा गाणवीर यांनी स्तनपान ही नवजात बालकासाठी सर्वोत्तम आहारपद्धती असून माता व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.

अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होण्याबरोबरच समाजामध्येही सकारात्मक संदेश पोहोचण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.या सप्ताहाच्या आयोजनासाठी प्रसूती व स्त्रीरोग परिचर्या विभागातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले असून कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

Next Post
जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 
क्रिडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 

August 5, 2026
जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम
आरोग्य

जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम

August 5, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत जनरेटिव्ह एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंग राष्ट्रीय एफडीपीचा समारोप
आरोग्य

गोदावरी अभियांत्रिकीत जनरेटिव्ह एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंग राष्ट्रीय एफडीपीचा समारोप

August 5, 2026
मन्यारखेडा तलाव प्रदूषण प्रकरण : १६ उद्योजकांना कारणे दाखवा नोटीस; त्रासाला कंटाळून तीन उद्योग पडले बंद
Uncategorized

मन्यारखेडा तलाव प्रदूषण प्रकरण : १६ उद्योजकांना कारणे दाखवा नोटीस; त्रासाला कंटाळून तीन उद्योग पडले बंद

August 5, 2026
उज्ज्वलकुमार चव्हाण व मिलन म्हात्रे यांना ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती पुरस्कार’ जाहीर; अमळनेरात २१-२२ ऑगस्टला सोहळा
जळगाव जिल्हा

उज्ज्वलकुमार चव्हाण व मिलन म्हात्रे यांना ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती पुरस्कार’ जाहीर; अमळनेरात २१-२२ ऑगस्टला सोहळा

August 4, 2026
सायबर जनजागृती: प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांसमोर उलगडले ‘हॅकरच्या मुखवट्यामागचे वास्तव’
शैक्षणिक

सायबर जनजागृती: प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांसमोर उलगडले ‘हॅकरच्या मुखवट्यामागचे वास्तव’

August 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add