• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 3, 2026
in आरोग्य
0
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ

भुसावळ, (प्रतिनिधी) : जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव तसेच श्री संत गाडगे महाराज नगरपालिका रुग्णालय, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष महिला आरोग्य शिबिर शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शिबिराच्या पहिल्याच दिवशी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने महिलांनी तपासणी व मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

या शिबिराचे उद्घाटन प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, सामाजिक कार्यकर्त्या रजनी सावकारे, आरोग्य सभापती मेघा वाणी, वैद्यकिय अधिकारी संदीप जैन, तौसिफ खान यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रसूती व स्त्रीरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

शिबिरामध्ये गर्भाशयाशी संबंधित आजार, गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता, स्तनातील गाठींची तपासणी, गर्भवती महिलांसाठी आयर्न सुक्रोज इंजेक्शनचे महत्त्व, स्तनपानाचे फायदे तसेच महिलांच्या विविध आरोग्य समस्यांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी सविस्तर मार्गदर्शन केले. अनेक महिलांची प्राथमिक तपासणी करण्यात आली असून आवश्यक असलेल्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी सल्ला देण्यात आला.

जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने मातांसाठी विशेष समुपदेशन सत्रही आयोजित करण्यात आले. यामध्ये नवजात बालकांसाठी स्तनपानाचे महत्त्व, पहिल्या सहा महिन्यांपर्यंत केवळ स्तनपान देण्याचे फायदे, माता व बालकांच्या आरोग्यासाठी स्तनपानाची भूमिका याबाबत माहिती देण्यात आली.

शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आयोजकांनी समाधान व्यक्त केले. १ ते १० ऑगस्ट या कालावधीत दररोज सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत हे शिबिर सुरू राहणार असून अधिकाधिक महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या महिला रुग्णांवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे सवलतीच्या दरात उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Next Post
बालरंगभूमी परिषद आणि व.वा. जिल्हा वाचनालयातर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धा उत्साहात संपन्न

बालरंगभूमी परिषद आणि व.वा. जिल्हा वाचनालयातर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

बालरंगभूमी परिषद आणि व.वा. जिल्हा वाचनालयातर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

बालरंगभूमी परिषद आणि व.वा. जिल्हा वाचनालयातर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धा उत्साहात संपन्न

August 3, 2026
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ
आरोग्य

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ

August 3, 2026
पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर
गुन्हे

पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर

August 2, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
शैक्षणिक

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

August 1, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

August 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add