• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

असंख्य नागरिकांनी घेतला मोफत कायदेशीर सल्ल्याचा लाभ

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 28, 2026
in जळगाव जिल्हा
0
न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

​जळगाव, (प्रतिनिधी) : ‘न्याय विश्वास फाउंडेशन’च्या वतीने जळगावकरांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नूतन मराठा महाविद्यालयातील सभागृहात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात जिल्ह्यातील असंख्य नागरिकांनी सहभाग नोंदवत विविध कायदेशीर विषयांवर तज्ज्ञ वकिलांकडून सविस्तर मार्गदर्शन घेतले.

​निकम कुटुंबाला वकिली क्षेत्राची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. बॅरिस्टर निकम यांनी वकिली व्यवसायात उल्लेखनीय कार्य केले, तर पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून देशभरात आपल्या कार्याचा ठसा उमटवला. याच परंपरेचा वारसा पुढे चालवत ॲड. अनिकेत निकम
यांनी सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य नागरिकांना कायदेशीर मदत व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला.

​दैनंदिन जीवनात कोर्ट-कचेरी, जमिनीचे वाद, मालमत्तेचे प्रश्न, पोलीस तक्रारी, कौटुंबिक वाद तसेच विविध कायदेशीर कागदपत्रांबाबत अनेक नागरिक संभ्रमात असतात. योग्य माहितीच्या अभावामुळे अनेकांना मानसिक, आर्थिक व कायदेशीर त्रासाला सामोरे जावे लागते. हीच अडचण दूर करण्यासाठी या मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

​शिबिरामध्ये ७/१२ उताऱ्याशी संबंधित प्रश्न, मालमत्तेचे हक्क, पती-पत्नीमधील व कौटुंबिक वाद, पोलीस तक्रारी, एफआयआर, न्यायालयीन प्रक्रिया, सायबर गुन्हे, ऑनलाईन आर्थिक फसवणूक तसेच महिला, बालक व ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर हक्क यांवर तज्ज्ञांकडून मोफत सल्ला देण्यात आला. याशिवाय गरजू नागरिकांना मोफत सरकारी कायदेशीर मदत कशी मिळू शकते, याचीही सविस्तर माहिती पुरवण्यात आली.

​प्रास्ताविक करताना ॲड. अनिकेत निकम यांनी सांगितले की, लोकांच्या मनात न्यायव्यवस्थेबद्दल विश्वास आणि कायद्याबद्दल जागृती निर्माण करण्याच्या उद्देशानेच या फाउंडेशनची स्थापना झाली आहे. भविष्यातही अशाच प्रकारचे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील. उपक्रमाला मिळणारा हा प्रतिसाद समाधानकारक असून सर्वसामान्यांना न्यायाबाबत जागरूक करण्याचे हे कार्य यापुढेही अविरत सुरू राहील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.


 

Next Post
जळगाव पोलीस दलातर्फे पत्रकारांसाठी ‘विश्वासाची लेन्स’ छायाचित्र स्पर्धेचे आयोजन

जळगाव पोलीस दलातर्फे पत्रकारांसाठी 'विश्वासाची लेन्स' छायाचित्र स्पर्धेचे आयोजन

ताज्या बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
खान्देश

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट
Uncategorized

१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

September 12, 2026
शहराचा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर; शनिवारी पाणीपुरवठा बंद
खान्देश

शहराचा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर; शनिवारी पाणीपुरवठा बंद

September 12, 2026
भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने सपासप वार करून हत्या; अल्पवयीन संशयित ताब्यात
खान्देश

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने सपासप वार करून हत्या; अल्पवयीन संशयित ताब्यात

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add