• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘मॉर्फोमाइंड २०२६’ पॅथॉलॉजी क्विझमध्ये ‘हॉजकिन्स हायटेक्स’ संघ विजेता

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात स्पर्धा उत्साहात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 11, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
‘मॉर्फोमाइंड २०२६’ पॅथॉलॉजी क्विझमध्ये ‘हॉजकिन्स हायटेक्स’ संघ विजेता

​जळगाव, (प्रतिनिधी) : येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या पॅथॉलॉजी विभागातर्फे ‘मॉर्फोमाइंड २०२६’ या शैक्षणिक पॅथॉलॉजी क्विझ स्पर्धेचे आयोजन डॉ. केतकी पाटील हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये पॅथॉलॉजी विषयाची सखोल समज विकसित करणे, स्पर्धात्मक वृत्तीला प्रोत्साहन देणे आणि शैक्षणिक गुणवत्तेला चालना देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोलंकी, रजिष्ट्रार प्रमोद भिरूड तसेच पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. धनंजय बोरोले व प्राध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते.

​या चुरशीच्या स्पर्धेत कूलीज क्युरेटर्स, अस्कानाझी अ‍ॅनालिस्ट्स, काजल्स क्रॅकर्स, ऑस्लर्स ऑसम्स, कूम्ब्स कॉन्क्लेव्ह आणि हॉजकिन्स हायटेक्स अशा एकूण सहा संघांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. विविध ज्ञानवर्धक आणि परस्परसंवादी फेर्‍यांनंतर झालेल्या अंतिम फेरीत ‘हॉजकिन्स हायटेक्स’ संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळविले. तर ‘अस्कानाझी अ‍ॅनालिस्ट्स’ संघाने द्वितीय (प्रथम उपविजेता) आणि ‘ऑस्लर्स ऑसम्स’ संघाने तृतीय (द्वितीय उपविजेता) क्रमांक मिळविला.

​विजेत्या संघांना पॅथॉलॉजी विभागप्रमुख डॉ. धनंजय बोरोले यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासू वृत्तीचे, टीमवर्कचे आणि उत्साहाचे कौतुक करताना सांगितले की, अशा शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे विषयावरील ज्ञान अधिक दृढ होते आणि वैद्यकीय शिक्षणात उत्कृष्टतेसाठी प्रेरणा मिळते.

संपूर्ण स्पर्धेचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. रेशमा वानखेडे आणि डॉ. निकिता ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पॅथॉलॉजी विभागाने सर्व मान्यवर, प्राध्यापक, निवासी डॉक्टर, स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. ‘मॉर्फोमाइंड २०२६’ ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, स्पर्धा आणि प्रेरणेचा एक अविस्मरणीय अनुभव ठरली.


 

Next Post
वारकर्‍यांसाठी डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी’तर्फे मोफत सेवा शिबिर

वारकर्‍यांसाठी डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी’तर्फे मोफत सेवा शिबिर

ताज्या बातम्या

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 25, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

August 25, 2026
आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
खान्देश

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add