• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वारकर्‍यांसाठी डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी’तर्फे मोफत सेवा शिबिर

तीन दिंड्यांतील शेकडो वारकर्‍यांना सेवाभावातून आरोग्याचा उपहार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 11, 2026
in आरोग्य, सामाजिक
0
वारकर्‍यांसाठी डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी’तर्फे मोफत सेवा शिबिर

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यात विठ्ठलनामाचा अखंड गजर करत पायी प्रवास करणार्‍या वारकर्‍यांच्या आरोग्याची काळजी घेत गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव यांच्या वतीने चाळीसगाव येथे मोफत फिजिओथेरपी सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. सेवाभाव, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीचा उत्कृष्ट प्रत्यय देणार्‍या या उपक्रमात तीन प्रमुख दिंड्यांमधील शेकडो वारकर्‍यांना मोफत आरोग्यसेवा प्रदान करण्यात आली.

दरवर्षी हजारो वारकरी अनेक किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतात. या दीर्घ प्रवासामुळे मान, पाठ, कंबर, गुडघे, पाय आणि सांध्यांमध्ये वेदना, स्नायूंचा ताण तसेच शारीरिक थकवा जाणवणे ही सामान्य बाब असते. हीच गरज ओळखून महाविद्यालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने वारकर्‍यांसाठी विशेष फिजिओथेरपी सेवा शिबिर आयोजित केले.

शिबिरात वारकर्‍यांच्या शारीरिक तक्रारींचे सखोल मूल्यमापन करून आवश्यक त्या फिजिओथेरपी उपचारांद्वारे वेदना कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय स्नायू व सांध्यांची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी स्ट्रेचिंगचे व्यायाम, ताकद वाढविणारे व्यायाम, योग्य शरीरस्थिती राखण्याचे मार्गदर्शन तसेच पुढील प्रवास अधिक आरामदायी व्हावा यासाठी आवश्यक आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला.

अनेक वारकर्‍यांनी उपचारानंतर वेदना कमी झाल्याची भावना व्यक्त करत डॉक्टरांच्या सेवाभावाचे कौतुक केले. या सेवा शिबिराचे समन्वयक म्हणून डॉ. मनोज सूर्यवंशी यांनी नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत संपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या नेतृत्वाखाली डॉ. उत्कर्ष भोळे, डॉ. सलोनी किर, डॉ. नयन शेटे आणि डॉ. सृष्टी तभाणे यांनी अत्यंत समर्पित भावनेने वारकर्‍यांची सेवा केली. प्रत्येक वारकर्‍याला आवश्यक ते उपचार व मार्गदर्शन मिळावे यासाठी डॉक्टरांच्या पथकाने दिवसभर अविरत कार्य केले.


 

Next Post
महापौर दीपमाला काळे सायकलने जळगाव ते पंढरपूर ४८५ किमीचा पल्ला गाठत विठ्ठल चरणी दाखल!

महापौर दीपमाला काळे सायकलने जळगाव ते पंढरपूर ४८५ किमीचा पल्ला गाठत विठ्ठल चरणी दाखल!

ताज्या बातम्या

दात साफ करताना सेफ्टी पिन गिळली; डॉक्टरांनी कौशल्याने काढली बाहेर
आरोग्य

दात साफ करताना सेफ्टी पिन गिळली; डॉक्टरांनी कौशल्याने काढली बाहेर

November 26, 2026
शामनगर घरफोडीचा छडा; रेल्वेस्थानकावरून आरोपी जेरबंद
गुन्हे

शामनगर घरफोडीचा छडा; रेल्वेस्थानकावरून आरोपी जेरबंद

November 26, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. गगन अग्रवाल यांची ईएनटी तज्ज्ञ म्हणून सेवा उपलब्ध
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. गगन अग्रवाल यांची ईएनटी तज्ज्ञ म्हणून सेवा उपलब्ध

November 26, 2026
७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया

November 26, 2026
महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया

November 26, 2026
थर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट-२०२६; महापौर दीपमाला काळे यांनी घेतले आधुनिक नागरी व्यवस्थापनाचे धडे
जळगाव जिल्हा

थर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट-२०२६; महापौर दीपमाला काळे यांनी घेतले आधुनिक नागरी व्यवस्थापनाचे धडे

November 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add