• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात ५६.२१ ग्रॅम मेफेड्रोन अमली पदार्थासह दोन जण गजाआड!

स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हापेठ पोलिसांची संयुक्त कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 11, 2026
in गुन्हे
0
जळगावात ५६.२१ ग्रॅम मेफेड्रोन अमली पदार्थासह दोन जण गजाआड!

​जळगाव, (प्रतिनिधी) : ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हापेठ पोलिसांनी संयुक्तपणे एक मोठी धडक कारवाई केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील शासकीय तांत्रिक विद्यालयाशेजारी असलेल्या जी.एस. ग्राउंडच्या प्रवेशद्वाराजवळ सापळा रचून ५६.२१ ग्रॅम वजनाचा ‘मेफेड्रोन’ (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने १० जुलै रोजी पहाटेच्या सुमारास ही कारवाई केली. पोलिसांनी संशयास्पदरीत्या दुचाकीवरून आलेल्या आरोपींना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, एकाने अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला, तर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

जयेष देविदास तायडे (वय २७, रा. हरी ओम नगर, जळगाव) आणि हितेंद्र शिवाजी परदेशी (वय ३१, रा. कांचन नगर, जळगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून २ लाख ८१ हजार ५४० रुपये किमतीचे ५६.२१ ग्रॅम एम.डी. आणि २५ हजार रुपयांची मोटारसायकल (MH-19-DJ-0132) जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत त्यांनी हा माल फरार आरोपी भय्या सोनवणे (रा. कांचन नगर) याच्याकडून विकण्यासाठी आणल्याची कबुली दिली असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

​अटक करण्यात आलेल्या जयेष तायडे या आरोपीवर यापूर्वीही रामानंद नगर, जिल्हापेठ आणि जळगाव शहर पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरामध्ये अंमली पदार्थांची विक्री किंवा वाहतूक होत असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

Tags: #jalgaon_cityCrimePolice
Next Post
‘मॉर्फोमाइंड २०२६’ पॅथॉलॉजी क्विझमध्ये ‘हॉजकिन्स हायटेक्स’ संघ विजेता

'मॉर्फोमाइंड २०२६' पॅथॉलॉजी क्विझमध्ये 'हॉजकिन्स हायटेक्स' संघ विजेता

ताज्या बातम्या

‘मॉर्फोमाइंड २०२६’ पॅथॉलॉजी क्विझमध्ये ‘हॉजकिन्स हायटेक्स’ संघ विजेता
जळगाव जिल्हा

‘मॉर्फोमाइंड २०२६’ पॅथॉलॉजी क्विझमध्ये ‘हॉजकिन्स हायटेक्स’ संघ विजेता

July 11, 2026
जळगावात ५६.२१ ग्रॅम मेफेड्रोन अमली पदार्थासह दोन जण गजाआड!
गुन्हे

जळगावात ५६.२१ ग्रॅम मेफेड्रोन अमली पदार्थासह दोन जण गजाआड!

July 11, 2026
नेत्रदीपक यश! खान्देश, विदर्भ आणि संभाजीनगरात ६१,२२९ मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा ऐतिहासिक टप्पा
जळगाव जिल्हा

नेत्रदीपक यश! खान्देश, विदर्भ आणि संभाजीनगरात ६१,२२९ मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा ऐतिहासिक टप्पा

July 11, 2026
चाळीसगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई; ६.५७ लाखांच्या गुटखा तस्करीसह ५ आरोपी जेरबंद
गुन्हे

चाळीसगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई; ६.५७ लाखांच्या गुटखा तस्करीसह ५ आरोपी जेरबंद

July 11, 2026
गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी किरीट भाईजी जळगावात येणार
धार्मिक

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी किरीट भाईजी जळगावात येणार

July 10, 2026
सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार यांचे विशेष हृदयविकार तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य

सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार यांचे विशेष हृदयविकार तपासणी व उपचार शिबिर

July 10, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group