• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 8, 2026
in जळगाव जिल्हा
0
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

जळगाव, (प्रतिनिधी) : अनेकांना घडविणारा, अनेकांच्या भावविश्वाला आकार देणारा आणि अनेकांच्या जीवनाला नवी दिशा देणारा माणूस आपल्या सर्वांना सोडून देवाघरी निघून गेला आहे. त्यांनी आपल्यावर केलेले संस्कार, लावलेली सवय, दिलेला विचार आणि सांगितलेला प्रत्येक शब्द आठवून त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे नुकतेच एका भावपूर्ण श्रद्धांजली शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

विशेष म्हणजे, ज्ञानेश्वर गायकवाड यांनी येथील व. वा. वाचनालयाच्या ज्या रामनारायण सभागृहात एकाच दिवशी एकाच बालनाट्याचे दहा प्रयोग करण्याचा ऐतिहासिक विक्रम केला होता, त्याच सभागृहात या शोकसभेचे आयोजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

या शोकसभेसाठी पुणे येथून ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या सहचरिणी अंजली धारु, त्यांची कन्या शर्वरी धारु व संपदा जोशी या विशेषत्वे उपस्थित होत्या. शोकसभेच्या शेवटी अंजली धारु यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ज्ञानेश्वर गायकवाड आणि जळगाव शहराचे असलेले अतूट ऋणानुबंध भावूकपणे उपस्थितांसमोर मांडले.

शोकसभेदरम्यान उपस्थित मान्यवरांनी ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यामध्ये प्रामुख्याने अध्यक्ष, बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा योगेश शुक्ल, ज्येष्ठ रंगकर्मी ओमप्रकाश शर्मा, चिंतामण पाटील, प्रतिमा धर्माधिकारी-याज्ञिक, राजेंद्र देशमुख, शंभू पाटील, पवन खंबायत, हर्षल पाटील, नाशिक येथील रंगकर्मी संदीप पाचंगे या सर्व रंगकर्मींनी आपल्या मनोगतातून गायकवाड यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

शोकसभेचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा पाटील-शुक्ल यांनी केले. या सभेला बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचे सर्व पदाधिकारी, सभासद, शहरातील कलावंत, नाट्य रसिक आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Next Post
जळगावात २६ जुलैला वंजारी समाजातर्फे २४ वा गुणवंत विद्यार्थी व सेवागौरव सत्कार समारंभ

जळगावात २६ जुलैला वंजारी समाजातर्फे २४ वा गुणवंत विद्यार्थी व सेवागौरव सत्कार समारंभ

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add