• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अजंदा रेल्वे पुलाजवळ लूटमार करणाऱ्या टोळीला २४ तासांत ठोकल्या बेड्या!

रावेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 7, 2026
in गुन्हे
0
अजंदा रेल्वे पुलाजवळ लूटमार करणाऱ्या टोळीला २४ तासांत ठोकल्या बेड्या!

​रावेर, (प्रतिनिधी) : रावेर जवळील अजंदा गावाच्या रेल्वे ब्रिजजवळ मजुरांचे आमिष दाखवून एका बांधकाम कंत्राटदाराला लुटणाऱ्या तीन संशयितांना रावेर पोलिसांनी अत्यंत शिताफीने २४ तासांच्या आत अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि मोबाईल जप्त करण्यात आला असून, न्यायालयाने त्यांना ८ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी जामीर शेख अमान (वय ४१, रा. फारुकी आझम कॉलनी, विवरे बु॥, ता. रावेर) हे बांधकाम ठेकेदार आहेत. कामासाठी मजुरांची गरज असल्याने, मुस्तकीम नावाच्या व्यक्तीने त्यांना मजूर मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. ४ जुलै रोजी मुस्तकीमने फिर्यादींना विवरे येथे बोलावून घेतले आणि ‘मजूर अजंदा गावी कामावर गेले आहेत, आपण तिथे जाऊन त्यांना आणू’ असे सांगून अजंदा रेल्वे पुलाजवळ नेले.
​​तेथे आधीच पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिव्हा गाडीजवळ दोन इसम उभे होते. तिथे पोहोचताच एका आरोपीने फिर्यादीच्या गळ्यावर चाकू ठेवून पैशांची मागणी केली. फिर्यादीकडे केवळ ५०० रुपये रोख होते, ते आरोपींनी हिसकावून घेतले. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी फिर्यादीचा मोबाईल फोन जबरदस्तीने घेत त्यांचा फोन पे (PhonePe) चा पिन मिळवला. त्यानंतर वेगवेगळ्या खात्यांवर तब्बल ८०,०००/- रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​​गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी अजंदा गाव व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, परंतु रात्रीची वेळ असल्याने आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. दरम्यान, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना आरोपींच्या गाडीबाबत अत्यंत गोपनीय आणि खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे रावेर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने तात्काळ सापळा रचून संशयित मुस्तकीम याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

​पोलिसांनी या प्रकरणी खालील तीन जणांना अटक केली आहे. यात १) शेख मुस्तकीम शेख अकील (वय २२ वर्षे, रा. फतेह नगर, रावेर), २) शेख मोईन शेख नईम (वय १९ वर्षे, रा. खिरडी रोड, विवरे), ३) फैजल बेग हिदायत बेग (वय १९ वर्षे, रा. शंकर प्लॉट, रावेर) यांचा समावेश आहे. ​यातील शेख मोईन शेख नईम हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात यापूर्वीही अशाच प्रकारे लोकांना लुटल्याचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीकडून आणखीही अनेक लुटीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

​ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, आणि फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कढजकर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेरचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पो.उप.निरीक्षक मनोज महाजन, पो.उप.निरीक्षक तुषार पाटील, तसेच डीबी पथकातील समाधान ठाकूर, विशाल पाटील, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण आणि सुकेश तडवी यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पो.उप.निरीक्षक मनोज महाजन करत आहेत.


 

Tags: #jalgaondistrictCrimePoliceRaver

ताज्या बातम्या

अजंदा रेल्वे पुलाजवळ लूटमार करणाऱ्या टोळीला २४ तासांत ठोकल्या बेड्या!
गुन्हे

अजंदा रेल्वे पुलाजवळ लूटमार करणाऱ्या टोळीला २४ तासांत ठोकल्या बेड्या!

July 7, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई: ८ गुन्ह्यांमधील १ कोटी ८६ लाखांचा गांजा नष्ट!
गुन्हे

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई: ८ गुन्ह्यांमधील १ कोटी ८६ लाखांचा गांजा नष्ट!

July 6, 2026
‘एटोपिक प्रेग्नन्सी’मुळे मृत्यूच्या दारात असलेल्या २० वर्षीय महिलेला जीवदान!
आरोग्य

‘एटोपिक प्रेग्नन्सी’मुळे मृत्यूच्या दारात असलेल्या २० वर्षीय महिलेला जीवदान!

July 6, 2026
तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत
शैक्षणिक

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

July 6, 2026
महादेव हॉस्पिटलतर्फे पाठीच्या कण्यावरील आजारांवर शिबिर
आरोग्य

महादेव हॉस्पिटलतर्फे पाठीच्या कण्यावरील आजारांवर शिबिर

July 6, 2026
डॉ. मिलिंद जोशी यांची ’सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजी’च्या चेअरमनपदी निवड
जळगाव जिल्हा

डॉ. मिलिंद जोशी यांची ’सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजी’च्या चेअरमनपदी निवड

July 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group