• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संत सखाराम महाराज वाडी संस्थान आग दुर्घटना: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

युद्धपातळीवर उपाययोजनांचे निर्देश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 3, 2026
in खान्देश, धार्मिक
0
संत सखाराम महाराज वाडी संस्थान आग दुर्घटना: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

अमळनेर, (प्रतिनिधी) : येथील ऐतिहासिक व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थान येथे लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी दुर्घटनास्थळाला आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि नुकसानीचा आढावा घेतला.

​याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी आणि उपस्थित नागरिकांशी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील भावुक झाले. ते म्हणाले, “संत सखाराम महाराज वाडी हे आपल्या सर्वांचेच अत्यंत पवित्र आणि मोठे श्रद्धास्थान आहे. येथे झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत जिल्हा व तालुका प्रशासनाला तात्काळ आणि युद्धपातळीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.”

​पालकमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले की, आगीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले असून, अहवाल प्राप्त होताच पुढील आवश्यक ती शासकीय मदत आणि पुनर्वसनाची कामे वेगाने सुरू करण्यात येतील. या पवित्र श्रद्धास्थानाचा वैभवशाली वारसा आणि वैभव पुन्हा पूर्ववत उभे राहील, असा ठाम विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. या पाहणी दौऱ्यादरम्यान नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर प्रशासकीय अधिकारी, संस्थानचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post
४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ

४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ

ताज्या बातम्या

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
खान्देश

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 21, 2026
नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!
जळगाव जिल्हा

नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!

August 21, 2026
अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका
गुन्हे

अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक
गुन्हे

वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक

August 21, 2026
जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने

August 20, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add