• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 30, 2026
in गुन्हे
0
जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव विमानतळासमोरील कुसुंबा परिसरातून धानवड गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर एका इसमाकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांना मिळाली. या माहितीच्या आधारे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ एक विशेष पथक तयार करण्यात आले.

​पथकाने घटनास्थळी जाऊन सापळा रचला असता, एक संशयित इसम पायी फिरताना दिसला. पोलिसांना पाहून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलीस पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याची रीतसर अंगझडती घेण्यात आली. या झडतीत त्याच्या पॅंटच्या मागील बाजूस, कमरेला खोचलेला २०,००० रुपये किमतीचा एक लोखंडी काळ्या रंगाचा गावठी कट्टा (मॅगझिनसह) मिळून आला.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश श्रावण सोनवणे (वय २४ वर्षे, व्यवसाय-मजुरी, रा. कुसुंबा, ता. जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जळगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, रमेश बाबूलाल चौधरी, रामकृष्ण पाटील, किरण पाटील, गणेश ठाकरे, सुभाष साळुंखे, रमाकांत साळुंखे, राहुल येथे, नितीन ठाकूर व शशिकांत मराठे यांच्या पथकाने केली आहे.

ताज्या बातम्या

जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद
गुन्हे

जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद

June 30, 2026
‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश
जळगाव जिल्हा

‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश

June 30, 2026
तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक
जळगाव जिल्हा

तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य
क्रिडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 30, 2026
डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव
जळगाव जिल्हा

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

June 30, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
जळगाव जिल्हा

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

June 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group