• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 30, 2026
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव सुवर्णनगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानच्या श्री संत मुक्ताबाई रामपालखी आणि दीड शतकी पंढरपूरकडे पायीवारी निघाली. जळगाव ते पंढरपूर पायीवारीचे वारीचे स्वागत जैन हिल्सच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ करण्यात आले. अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन यांनी उत्सवमूर्तीचे दर्शन घेतले. तर जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी विजय मुथा पालखीचे पूजन आणि वारकरींचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी एस. बी. ठाकरे, चंद्रकांत चौधरी, भिमराव दांडगे, किशोर पाटील यांनी श्रीराम मंदिर संस्थान (आप्पा महाराज समाधी मंदिर) चे विद्यमान गादीपती मंगेश महाराज यांची सेवा केली.

जैन इरिगेशन सिस्टीम्स कंपनीने या यात्रेबरोबर संत मुक्ताबाईंच्या श्रीराम पालखीबरोबर मदत म्हणून एक मालवाहू वाहन तसेच सजावट केलेल्या प्रवासी वाहनाची उपलब्धता दर वर्षी करण्यात येत असते, हे वाहन वारकऱ्यांसोबतच पंढरपूर येथे जात असते. या पालखीची स्थापना १७९४ मध्ये झाली तेव्हापासून अखंडपणे हा पालखी सोहळा होत असतो. दरवर्षी ही वारी जात असताना जैन हिल्स येथे आदरातिथ्य स्वीकारून पुढे मार्गस्थ होते. यावेळी ह.भ.प. श्रीराम महाराज यांच्यासह शेकडो वारकऱ्यांसोबत पालखीचे पंढरपूरकडे पुढील प्रवासासाठी प्रस्थान झाले.

जैन हिल्सच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ जी. आर. पाटील, मनोहर बागुल, सुनील खैरनार, अभिजीत शुक्ला, नितीन चोपडा, श्रेयेस कुमट यांच्यासह श्रीराम मंदीर संस्थचे विश्वस्त मंडळी उपस्थित होते. जैन इरिगेशनतर्फे वारीमध्ये सहभागी वारकऱ्यांना अल्पोहार वाटप करण्यात आले. दिंडीच्या स्वागतासाठी जैन इरिगेशनच्या मानव संसाधन विभाग, सुरक्षा विभाग, राजभोज खानपान विभागातील सहकाऱ्यांनी सहकार्य केले.


 

Next Post
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add