• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत सुरवात

मकरा चॅलेंजर्स, आप्पासाहेब लिजेंड्स, साईनाथ टायटन्स, लीजर स्पोर्ट्स स्टार्स संघांची विजयी सुरवात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 27, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
जळगाव कॅरम लीग स्पर्धेला आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत सुरवात

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे विद्यमाने आयोजित व जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड पुरस्कृत जळगाव कॅरम लीग- पर्व २ ही स्पर्धची शानदार सुरवात झाली.पहिल्या सामन्यांमध्ये मकरा चॅलेंजर्स, आप्पासाहेब लिजेंड्स, साईनाथ टायटन्स, लीजर स्पोर्टस स्टार्स संघांनी विजयी सुरवात केली आहे. आजपासून सुरू झालेल्या स्पर्धा २८ जून पर्यंत कांताई सभागृह येथे होईल.

या स्पर्धेचे उद्घाटन आमदार सुरेश भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत यूसुफभाई मकरा, अरविंद देशपांडे, ॲड. रविंद्र कुलकर्णी, मंजूर खान, रंगनाथ पाटील, आरीश शेख, आमीर शेख, रेहान सालार, आसीफ खान,अशफाक शेख यांच्यासह आयोजन समितीचे प्रमुख सय्यद मोहसीन, हमिद भुसावली, रविंद्र धर्माधिकारी, हबीब शेख, फजल मोहम्मद, फिरोज खान, शेख अजीज, अताउल्लाह खान यांची उपस्थीती होती.

आठ संघामध्ये होणाऱ्या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट असे ४८ व महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यांमधील जैन इरिगेशनचे व महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केलेले ८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विजेते खेळाडूंनी सहभाग घेतला. ही स्पर्धा प्रथम लीग पद्धतीने व नंतर बाद पद्धतीने खेळविली जात आहे. स्पर्धेत पहिल्या चार क्रमांकाच्या संघांना रोख पारितोषिके आणि चषक अशा एकूण ६५ हजारांचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. त्याचप्रमाणे स्पर्धेतील सहभागी सर्व खेळाडूंना मेडल सुद्धा दिली जाईल.

स्पर्धा सिस्का कंपनीच्या बुलेट शॉट ह्या कॅरम बोर्ड व सोंगट्यांसह खेळविण्यात येत आहे. गणेश लोडते यांनी सुत्रसंचालन केले. जळगाव जिल्ह्यातील सर्व कॅरम व क्रीडाप्रेमींनी सदर स्पर्धेत येऊन कॅरमचा आनंद घ्यावा, असे आवाहन जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम कोगटा, सरकार्यवाह नितीन बरडे यांच्यासह आयोजकांनी केले आहे. पहिल्या फेरीमध्ये आप्पासाहेब लिजेंडस संघाने सालार किंग्ज संघाचा २-१, मकरा चॅलेंजर्स संघाने अरिश लॉयन्स संघाचा ३-० ने, साईनाथ टायटन्स संघाने स्पोर्ट हाऊस स्ट्रायकर संघाच २-१ ने आणि लिजर स्पोर्ट स्टार्स संघाने श्रीउत्तम हर्बल रायडर्स संघाचा ३-० ने पराभव करुन विजयी सुरवात केली.


 

Tags: #sports
Next Post
बहुप्रतिक्षित ‘रिंग रोड’ कामाचे थाटात भूमिपूजन; ​आमदार राजुमामा भोळेंच्या प्रयत्नांना यश

बहुप्रतिक्षित 'रिंग रोड' कामाचे थाटात भूमिपूजन; ​आमदार राजुमामा भोळेंच्या प्रयत्नांना यश

ताज्या बातम्या

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add