• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!

विद्यार्थ्यांच्या ‘आशा-सुमन स्वर सुमनांजली’ने जळगावकर रसिक मंत्रमुग्ध

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 20, 2026
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!

जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मृगोत्सव’ या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांच्या अजरामर गीतांना समर्पित ‘आशा-सुमन: स्वर सुमनांजली’ हा सांगीतिक कार्यक्रम २० जून २०२६ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडला. पावसाळा आणि संगीताचा हा अनोखा संगम अनुभवण्यासाठी जळगावकर रसिकांनी मोठी गर्दी केली होती.

सुरेल आणि मनोहारी सादरीकरण..
पावसाच्या आगमनाचे स्वागत करत विद्यार्थ्यांनी गायन व नृत्याच्या विविध कलाप्रकारांचे मनोहारी सादरीकरण केले. कार्यक्रमाची सुरुवात ‘ओंकार प्रधान’ या गणेशवंदनेने झाली. त्यानंतर ‘नाविका रे’, ‘ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर’, ‘केतकीच्या वनी तिथे’, ‘केशवा माधवा’, ‘दो लब्जों की है’, ‘धुंदी कळ्यांनो’, ‘सारे के सारे गा मा को’, ‘चंदा राणी’, ‘जाइए आप कहाँ जायेंगे’, ‘अभी ना जाओ छोड़कर’ आणि ‘ओ मेरे सोना रे’ यांसारखी एकापेक्षा एक लोकप्रिय गीते सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय, ‘पिया बावरी’ आणि ‘कोई शहरी बाबू’ या गाण्यांवर सादर झालेल्या कथक नृत्याच्या आकर्षक प्रस्तुतीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, संचालिका डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकीताई पाटील आणि प्राचार्या पद्मजा नेवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात समीक्षा माकोडे, वेदिका झारे, मंजिरी जोशी, राजश्री पाठक, अलका खैरनार, किरण सानी, नाजनीन शेख, हितेशी प्रजापती, ऐश्वर्या काळकर, नंदा दैवज्ञ, राधिका दैवज्ञ, रिया वर्मा, समृद्धी जोशी, लावण्या दहाड, कनकश्री अय्यंगार, निशिता चौधरी, निकिता जोशी, प्रणव ईखे, पूजा नारखेडे, दिशा महाजन, काव्या बोबडे, आरुषी अदमाने, रिया दहाड, स्वरा थोरात, अथर्व पाटील, डेलिना अतरदे, धनश्री जोशी, वीरा चौधरी, वैदेही राजपूत, आरोही सूर्यवंशी आदी बाल व युवा कलाकारांनी आपल्या कलेचे प्रभावी सादरीकरण केले.

या कलाकारांना सिंथेसायझरवर सुशील महाजन, ऑक्टोपॅडवर प्रा. देवेंद्र गुरव आणि तबल्यावर प्रवीण महाजन यांनी सुरेल साथसंगत केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या फासे यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ. महिमा मिश्रा यांनी मांडले. आभार प्रदर्शन भूषण खैरनार यांनी केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या पद्मजा नेवे आणि डॉ. महिमा मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र व्यवस्थापक राजू पाटील, अनंता साठे, किशोर चौधरी आणि ईश्वर पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात गीतांचा सुरेल आविष्कार अनुभवायला मिळाल्याने उपस्थित रसिकांनी कलाकारांचे भरभरून कौतुक केले.


 

Next Post
गुजरातधून चोरी झालेली कार जळगावात जप्त; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

गुजरातधून चोरी झालेली कार जळगावात जप्त; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

ताज्या बातम्या

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add