• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ | शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 8, 2026
in कृषी, जळगाव जिल्हा
0
फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ | शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जळगाव, (प्रतिनिधी) : हवामान बदलासह मानवनिर्मित आपत्तींमुळे शेती ही न परवडणारी होत आहे, ही नकारात्मकता तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती केल्यास बदलू शकते, मागील काही वर्षात शेतीमध्ये खूपच बदल झाले आहेत, यातून भारताचे विकसीत होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. मुलांमध्ये नेतृत्व कौशल्य विकसित करणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) हे आधुनिक कृषीक्षेत्राचे ‘पॉवर ऑफ हाऊस’ म्हणून पुढे येत आहे असा सुर उद्योजक प्रतिनिधी, शेतकरी व फाली मधील विद्यार्थी यांच्यात झालेल्या संवादात उमटला.

जैन हिल्स येथे फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया च्या १२ व्या वार्षिक अधिवेशनातील अंतिम टप्प्याची आज सुरवात झाली. शिवार फेरीत टिश्यूकल्चर रोपांचे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी जैन हायटेक प्लॉन्ट फॅक्टरी, टिश्यूकल्चर लॅब, प्रक्रिया उद्योग समजण्यासाठी जैन फार्मफ्रेश फूडच्या कांदा निर्जीलकरण प्रकल्प, आंबा प्रक्रिया प्रकल्पा सह अन्य विभागांना विद्यार्थ्यांनी भेटी दिल्यात. यानंतर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘खोज गांधीजी की’ या ऑडिओ गाईडेड संग्राहलयातून महात्मा गांधीजींचे विचार आत्मसात केले. भविष्यातील शेती म्हणजे माती विरहित शेती ‘फ्यूचर फार्मिंग’, हायड्रोपोनिक फार्मिक अनुभवली. यानंतर झालेल्या गट चर्चेत शेतकरी, उद्योजकीय प्रतिनिधींशी फालीच्या विद्यार्थ्यांनी संवाद साधला.

परिश्रम व आकाश ग्राऊंडवर झालेल्या चर्चेत शेतकरी नारायण पाचपांडे, उमाकांत भारंबे, सागर पाटील, पंकज घाटे, भागवत बाजीराव पाटील, विशाल पाटील, क्रिष्णा पाटील यांच्यासोबत विद्यार्थी गौरी त्रिपाठी, श्रृती चौहान, सिद्धी गावकर, शिवा देवसाकर, सेजल पाटील, प्राजक्ता भार्गव यांच्यासह विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. यात त्यांनी कार्बन क्रेडिट शेती, महिलांचे शेतीमधील योगदान, ठिबक सिंचनच्या माध्यमातून पाणी बचत व खतांचा कार्यक्षमतेने वापर, टिश्यूकल्चर तंत्रज्ञानातून निर्यातक्षम उत्पादन, प्रक्रिया उद्योगवाढीसाठी लागणारे घटक, पोल्ट्रीउद्योग, ऑटोमेशन व आर्टिफेशियल तंत्रज्ञामुळे शेतीतील बदल, उत्पादन ते ट्रेडिंग पर्यंतची साखळी यासह नवनविन कृषी उद्योजकीय कल्पनांवर चर्चा करण्यात आली.

प्रश्नोत्तरातून फालीच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांकडून शेतीमधील बारकावे तसेच आव्हाने आणि त्यावर मात करण्यासाठी लागणारे कौशल्य समजून घेतले. आकाश ग्राऊंड येथे झालेल्या शेतकरी संवादाचे सुत्रसंचालन जुली पटेल यांनी केले. तर परिश्रम हॉल येथे झालेल्या गट चर्चेचे समन्वयन शाबोर्नी पोद्दार यांनी केले.

 


 

Next Post
खगोलप्रेमींसाठी पर्वणी: देशभरात आज दिसणार उघड्या डोळ्यांनी ‘शुक्र-गुरु’ ग्रहांची महायुती

खगोलप्रेमींसाठी पर्वणी: देशभरात आज दिसणार उघड्या डोळ्यांनी 'शुक्र-गुरु' ग्रहांची महायुती

ताज्या बातम्या

पती जेवणासाठी बाहेर गेले असताना १८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
गुन्हे

पती जेवणासाठी बाहेर गेले असताना १८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

September 23, 2026
गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत* *गणेश फेस्टिवल पोस्टल नाईट कॅम्पला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खान्देश

गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत* *गणेश फेस्टिवल पोस्टल नाईट कॅम्पला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
वॉटर मीटरच्या सदोष कारभारावरून महापौरांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी
खान्देश

वॉटर मीटरच्या सदोष कारभारावरून महापौरांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी

September 23, 2026
सेवा मंडळासमोरील विसर्जन मार्गावरील खड्ड्यांवरून महापौर दीपमाला काळे आक्रमक; मक्तेदाराला दूरध्वनीवरून धरले धारेवर..!
खान्देश

सेवा मंडळासमोरील विसर्जन मार्गावरील खड्ड्यांवरून महापौर दीपमाला काळे आक्रमक; मक्तेदाराला दूरध्वनीवरून धरले धारेवर..!

September 23, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

उसनवारीचे पैसे मागितलेच्या रागातून महिलेच्या गळ्यावर ब्लेडने वार; संतप्त नागरिकांकडून संशयिताला चोप 

September 23, 2026
पोलिस असल्याची बतावणी करत वृद्ध व्यावसायिकाचे दागिने लंपास
गुन्हे

पोलिस असल्याची बतावणी करत वृद्ध व्यावसायिकाचे दागिने लंपास

September 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add