• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भुसावळात ३० हजारांची लाच मागणाऱ्या फौजदारासह खाजगी इसमावर गुन्हा; पोलीस उपनिरीक्षक फरार!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 29, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
भुसावळात ३० हजारांची लाच मागणाऱ्या फौजदारासह खाजगी इसमावर गुन्हा; पोलीस उपनिरीक्षक फरार!

​जळगाव, (प्रतिनिधी) : भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात अटक न करता केवळ ‘चॅप्टर केस’ करून प्रकरण मिटवण्यासाठी तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शविल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आणि त्याच्या एका खाजगी मध्यस्थाविरुद्ध जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईत खाजगी इसमाला ताब्यात घेण्यात आले असून, आरोपी पोलीस उपनिरीक्षक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राजू सांगळे (पोलीस उपनिरीक्षक, वर्ग-२, नेमणूक भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन) आणि सलीम हकीम कुरेशी (वय ४६, रा. कुरेशी मोहल्ला, बोदवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

​याबाबत सविस्तर वृत्त असे की, मूळ तक्रारदार व त्यांच्या मित्राचे दि. २८ मार्च २०२६ रोजी भुसावळ येथील खडका चौफुलीवर पैसे परत मागण्याच्या कारणावरून एका व्यक्तीशी किरकोळ भांडण झाले होते. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रारदार व त्यांच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटक न करण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच द्यावी लागेल, अशी मागणी पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे याने तक्रारदाराच्या पत्नीकडे केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने दि. ७ एप्रिल २०२६ रोजी जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली.

​ACB पथकाने दि. ७ एप्रिल रोजीच पंचसमक्ष या लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तपासादरम्यान खाजगी इसम सलीम कुरेशी याने तक्रारदाराला अटक न करता केवळ चॅप्टर केस करून सोडण्याच्या मोबदल्यात पीएसआय सांगळे यांच्यासाठी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने पीएसआय राजू सांगळे यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता, त्यानेही या गुन्ह्यात अटक न करता प्रकरण मिटवण्यासाठी तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दर्शवून ती रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला.

​लाचेची मागणी निष्पन्न झाल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर आरोपी पीएसआय राजू सांगळे हा फरार झाला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग त्याचा शोध घेत आहे, तर खाजगी इसम सलीम कुरेशी याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे.

​ही कारवाई लाप्रवि नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, जळगाव एसीबीचे पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता नवघरे, तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, तसेच अंमलदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अमोल सूर्यवंशी, भूषण पाटील, राकेश दुसाने व प्रनेश ठाकूर यांच्या पथकाने केली.


 

Tags: #curption#jalgaondistrictBhusawalCrimePolice
Next Post
चोपड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हा दाखल

चोपड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद राहणार; ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय
जळगाव जिल्हा

रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद राहणार; ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026
गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप
जळगाव जिल्हा

गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप

July 15, 2026
जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’
मनोरंजन

जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’

July 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add