• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कमी वजन, मुदतपूर्व जन्म… तरीही जिद्दीने जिंकली मृत्यूशी झुंज!

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयातील बालरोग तज्ञांची कामगीरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 15, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
कमी वजन, मुदतपूर्व जन्म… तरीही जिद्दीने जिंकली मृत्यूशी झुंज!

जळगाव, (प्रतिनिधी) : मुदतपूर्व प्रसूतीमुळे जन्मलेल्या कमी दिवसांच्या आणि अत्यंत कमी वजनाच्या नवजात शिशूवर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील एनआयसीयू विभागात यशस्वी उपचार करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या वेळेवर केलेल्या उपचारांमुळे या शिशूची प्रकृती सुधारून त्याला नवजीवन मिळाले आहे.

याबाबत माहिती अशी की, किशोर इंगळे (रा. रावेर) यांच्या पत्नीला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिची मुदतपूर्व प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतर जन्मलेले शिशू अत्यंत कमी वजनाचे होते. तसेच श्वसनास त्रास, अशक्तपणा आणि शरीरातील आवश्यक कार्ये व्यवस्थित न होणे अशा गंभीर समस्या दिसून आल्या. त्यामुळे शिशूची प्रकृती चिंताजनक बनली होती. शिशूला तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील अत्याधुनिक एनआयसीयू (नवजात अतिदक्षता विभाग) मध्ये दाखल करण्यात आले.

नवजात शिशू तज्ज्ञ डॉ. सुयोग तन्नीरवार यांनी शिशूची सखोल तपासणी केली. तपासणीअंती शिशूचे वजन अत्यल्प असल्याने त्याच्यावर विशेष निगराणीखाली उपचार सुरू करण्यात आले. एनआयसीयूमध्ये शिशूला आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात आल्या. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे, श्वसनासाठी आवश्यक मदत, संसर्गापासून संरक्षण, तसेच योग्य प्रमाणात पोषण देण्यावर विशेष भर देण्यात आला.

डॉक्टर आणि परिचारिका यांच्या सततच्या देखरेखीमुळे शिशूमध्ये हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागले. उपचाराच्या पहिल्याच आठवड्यात शिशूच्या वजनात वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर नियमित उपचार, पोषण व्यवस्थापन आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे महिनाभरात शिशूची प्रकृती लक्षणीयरीत्या सुधारली. सध्या शिशू पूर्णपणे सुरक्षित असून त्याला घरी सोडण्यात आल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली. या उपचारासाठी डॉ. कुशल धांडे, डॉ. ओमश्री गुडे, डॉ. विशाल कोठावदे, डॉ. अस्मिता गायकवाड, डॉ. सृष्टी भिरूड, भारती झोपे यांनी सहकार्य केले.

▪️मुदतपूर्व जन्मलेल्या आणि कमी वजनाच्या शिशूंमध्ये अनेक गुंतागुंती निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळी तातडीने योग्य उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. या शिशूवर एनआयसीयूमध्ये अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यात आले. डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि पालकांच्या सहकार्यामुळे शिशूची प्रकृती सुधारण्यास मदत झाली.
– डॉ. ओमश्री गुडे, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव खुर्द


 

Next Post
जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add