• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्ष पदी संध्या अश्विन कांकरिया

वार्षिक सभेत अशोक जैन यांनी केली घोषणा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 13, 2026
in सामाजिक
0
श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्ष पदी संध्या अश्विन कांकरिया

जळगाव, (प्रतिनिधी) : श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ, जळगाव यांच्या वार्षिक सभेचे आयोजन दि. १० मे २०२६ रोजी जैन हिल्स येथे करण्यात आले होते. सभेची सुरुवात शासनपती भगवान महावीर स्वामीजी, प. पू. आचार्य सम्राट आनंदऋषीजी म. सा., वर्तमान आचार्य शिवमुनिजी म. सा. तसेच युवाचार्य प्रवर प .पू. महेंद्रऋषीजी म. सा. यांना वंदन करून आणि सामूहिक नवकार महामंत्र पठणाने झाली.

सभेच्या प्रारंभी देवलोकगमन झालेल्या महासाध्वी वाणीभूषण प.पू. प्रीतिसुधाजी म.सा. तसेच महासाध्वी प.पू. पद्मश्री डॉ. चंदनाजी म.सा. यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले. सभामंचावर जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर रमेशदादा जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी, तारादेवी रेदासनी, ताराबाई डाकलिया, ज्योती अशोक जैन, दिलीप चोपडा, अनिल कोठारी, शांतीलाल बिनायक्या, नंदलाल गादिया उपस्थित होते. सभेत नवीन अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

अशोक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली एकमताने संध्या अश्विन कांकरिया यांची अध्यक्षा म्हणून निवड केली. कार्यकारिणीत शांतीलाल बिनायक्या, नगरसेवक अमर जैन, संजीव मेहर, नंदलाल गादिया, सुनील ललवाणी, संदीप रेदासनी, रूपेश लुंकड, प्रवीण पगारिया, राजेंद्र पारख, दिनेश डाकलिया, अतुल जैन, महेंद्र लोढा, जितेंद्र जांगडा, नरेंद्र सांडेचा, नरेंद्र कोठारी, दिनेश बोरा, नरेंद्र बंब, अजित कोठारी, सुनीता डाकलिया, डॉ. सोनाली जैन, सीए तेजल संघवी, तृप्ती रायसोनी, संगीता पारख, स्वीटी देसर्डा, अनिता कांकरिया, प्रदीप श्रीश्रीमाळ, बाबूशेठ श्रीश्रीमाळ, प्रवीण धाडीवाल, अनिल सिसोदिया, प्रियेश छाजेड यांचा समावेश आहे.

संध्या कांकरिया यांनी मागील वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा सांगत अशोक जैन, प्रदीप रायसोनी यांच्या वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. श्रमण संघाच्या नियमावलीचे वाचन दिलीप चोपडा यांनी केले. विभाग प्रमुखांच्या कार्याची माहिती, भविष्यातील रणनीती याविषयी रमण छाजेड यांनी मनोगत व्यक्त केले. श्रमण संघ सदस्य डायरेक्टरीबाबतची माहिती जितेंद्र कोठारी यांनी माहिती केली.

संघटनात्मक एकता महत्त्वाची – अशोक जैन
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अशोक जैन म्हणाले की, समाजातील सर्व सदस्यांनी एकजुटीने धर्मसेवा, संतसेवा आणि संघसेवेसाठी सदैव पुढाकार घेतला पाहिजे. पदाची अपेक्षा न ठेवता समर्पणभावाने सेवा करणे आवश्यक आहे. मागील कार्यकाळातील उपक्रमांकडे पाहिले असता एकतेच्या बळावर किती सुंदर कार्य घडू शकते, हे स्पष्ट होते. ही संघटनात्मक एकता कायम राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. “संघ, समाज, संप्रदाय, गच्छ आणि संतवृंदांविषयी बेजबाबदार वक्तव्य करू नये. सार्वजनिकरित्या कोणी असे करत असल्यास त्याला त्याच ठिकाणी रोखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. तेच खरे संघहित आणि संघसेवा ठरेल.”


 

Next Post
पोलीस दल व डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा मार्गदर्शन संपन्न

पोलीस दल व डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा मार्गदर्शन संपन्न

ताज्या बातम्या

होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा; नर्सिंग विद्यार्थ्यांना आवाहन
Uncategorized

होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा; नर्सिंग विद्यार्थ्यांना आवाहन

November 24, 2026
बालगंधर्व नाट्यगृहाच्या बंदिस्त कामासाठी अडीच कोटी मंजूर; वर्षभरात दिवस-रात्र नाट्यप्रयोग रंगणार
जळगाव जिल्हा

बालगंधर्व नाट्यगृहाच्या बंदिस्त कामासाठी अडीच कोटी मंजूर; वर्षभरात दिवस-रात्र नाट्यप्रयोग रंगणार

November 24, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
खान्देश

कौटुंबिक वादातून पत्नीला बेदम मारहाण व जीवे मारण्याची धमकी; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

November 24, 2026
व्याजाच्या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल
खान्देश

व्याजाच्या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

November 24, 2026
डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची आंतरविभागीय चाचणीसाठी निवड
क्रिडा

डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची आंतरविभागीय चाचणीसाठी निवड

November 24, 2026
जेठाणीसोबतच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पतीला जन्मठेप, मुलाला दोन लाखांची भरपाई
गुन्हे

जेठाणीसोबतच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पतीला जन्मठेप, मुलाला दोन लाखांची भरपाई

November 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add