• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता ५ लाखांची लाच घेताना जाळ्यात; १५ लाखांची केली होती मागणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 9, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता ५ लाखांची लाच घेताना जाळ्यात; १५ लाखांची केली होती मागणी

​जळगाव, (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) शाखा अभियंता योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहात पकडले. प्रलंबित देयके मंजूर करण्यासाठी त्यांनी एकूण १५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तक्रारदार हे सब-कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी जळगाव शहरातील वॉर्ड क्र. १४ विनोबा नगर येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण केले होते. या कामाचे सुमारे ३८ लाख ४९ हजार रुपयांचे बिल अद्याप प्रलंबित होते. हे थकीत बिल मंजूर करण्याच्या बदल्यात शाखा अभियंता योगेश अहिरे यांनी सुरुवातीला १८ लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम १५ लाख रुपये ठरवण्यात आली. यामध्ये स्वतःसाठी ७ लाख ५० हजार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ७ लाख ५० हजार रुपये देण्याचे अहिरे यांनी मान्य केले होते.

लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून ५ लाख रुपये आज (९ मे २०२६) देण्याचे ठरले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी करून जळगाव सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरात सापळा रचला. योगेश अहिरे यांनी आपल्या निळ्या रंगाच्या बलेनो कारमध्ये (एम.एच.१९ सी.व्ही.२६१९) बसून ५ लाख रुपयांची लाच स्वीकारली. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

​ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा आवतारे आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Tags: #corruptionCrimePolice
Next Post
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add