• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 6, 2026
in जळगाव जिल्हा
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव तसेच लेवा भ्रातृमंडळ पिंपळे सौदागर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न झाला.

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या रोजगार मेळाव्यासाठी २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रारंभी नोंदणी व मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. त्यानंतर विविध उद्योगसंस्थांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना उपलब्ध पदांची माहिती दिली. यानंतर लेखी परीक्षा, तांत्रिक मुलाखत आणि वैयक्तिक मुलाखत असे विविध टप्पे पार पाडण्यात आले.

या मेळाव्यात प्रोफासाईमा ग्लोबल सोल्यूशन्स एलएलपी, त्रिविम टेक्नो क्राफ्ट्स प्रा. लि., प्रोसर इंडस्ट्रीज (पुणे), प्रोटोवोक टेक्नॉलॉजीज प्रा. लि. (मुंबई), छबी इलेक्ट्रिकल जळगाव, स्पेशालिटी सिंटर्ड प्रॉडक्ट्स लि. (सातारा), मनराज ऑटोमोबाईल्स (जळगाव), इंगीअर्ज प्रा. लि. सातारा , एनबीटी टेक्नॉलॉजीज प्रा. लि. (पुणे), किरण मशीन टूल्स जळगाव, स्टार फॅब्रिकेटर्स जळगाव गोदावरी फाउंडेशन तसेच युवा शक्ती फाउंडेशन, क्वेस क्रॉप प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित उद्योगसंस्थांचा सहभाग होता.

या संस्थांनी अभियांत्रिकी, यंत्र, विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स, स्वयंचलन, माहिती तंत्रज्ञान, उत्पादन व व्यवस्थापन क्षेत्रातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली. काही संस्थांनी प्रशिक्षणासह नोकरीच्या संधीही उपलब्ध करून दिल्या.या संपूर्ण प्रक्रियेनंतर अधिकाधिक विद्यार्थ्यांची अंतिम निवड होऊन त्यांना नोकरीच्या संधी देण्यात आल्या.

उपक्रमासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. विजयकुमार वानखेडे, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. या यशस्वी उपक्रमामागे महाविद्यालयाचा प्रशिक्षण व नियोजन विभाग, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांचा मोठा वाटा आहे. विविध उद्योगसंस्थांची उपस्थिती आणि उल्लेखनीय निवड यामुळे हा रोजगार मेळावा अत्यंत यशस्वी ठरला असून सदर रोजगार मेळाव्याच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.

Tags: #jobJalgaon
Next Post
सीईओ करिश्मा नायर यांचा रावेर दौरा; ग्रामपंचायत ते आरोग्य केंद्रापर्यंत कामकाजाचा घेतला आढावा

सीईओ करिश्मा नायर यांचा रावेर दौरा; ग्रामपंचायत ते आरोग्य केंद्रापर्यंत कामकाजाचा घेतला आढावा

ताज्या बातम्या

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
आरोग्य

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

June 26, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल; पहिल्याच बॅचचे घवघवीत यश
आरोग्य

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल; पहिल्याच बॅचचे घवघवीत यश

June 26, 2026
रावेर पोलिसांची धडक कारवाई: दोन सराईत दुचाकी चोर गजाआड; दोन मोटारसायकली हस्तगत
गुन्हे

रावेर पोलिसांची धडक कारवाई: दोन सराईत दुचाकी चोर गजाआड; दोन मोटारसायकली हस्तगत

June 26, 2026
बंडखोर खासदारांच्या फोटोंना जोडे मारून जळगावात ठाकरे गटाचा तीव्र निषेध
जळगाव जिल्हा

बंडखोर खासदारांच्या फोटोंना जोडे मारून जळगावात ठाकरे गटाचा तीव्र निषेध

June 26, 2026
रामटेकच्या भव्य कुस्ती स्पर्धेत जळगावच्या सौरभ पवारचा डंका; पटकावली २.५ किलोची मानाची चांदीची गदा!
क्रिडा

रामटेकच्या भव्य कुस्ती स्पर्धेत जळगावच्या सौरभ पवारचा डंका; पटकावली २.५ किलोची मानाची चांदीची गदा!

June 26, 2026
मेहरूण तलाव परिसरात दहशत निर्माण करणारा गुन्हेगार पिस्तूलासह अटकेत; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
गुन्हे

मेहरूण तलाव परिसरात दहशत निर्माण करणारा गुन्हेगार पिस्तूलासह अटकेत; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

June 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group