• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शस्त्रास्त्र तस्करी अन् अवैध वाहतुकीला ‘ब्रेक’; जळगाव पोलिसांची रात्रीची धडक कारवाई; ७० बसेसची तपासणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 4, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
शस्त्रास्त्र तस्करी अन् अवैध वाहतुकीला ‘ब्रेक’; जळगाव पोलिसांची रात्रीची धडक कारवाई; ७० बसेसची तपासणी

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि रात्रीच्या वेळी होणारी अवैध वाहतूक, अंमली पदार्थ तसेच अवैध शस्त्रास्त्रांच्या तस्करीला पायबंद घालण्यासाठी पोलीस दलातर्फे काल रात्री धडक मोहीम राबविण्यात आली. या विशेष ऑपरेशनमध्ये ७० खाजगी ट्रॅव्हल्स बसेसची सखोल झडती घेण्यात आली असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून २०,००० रुपयांचा प्रलंबित दंड वसूल करण्यात आला आहे.

आकाशवाणी चौक, अजिंठा चौफुली, भुसावळ नाका, अमळनेर स्टॉप (पारोळा) याठिकाणी रात्री ८ ते १२ आणि पहाटे ४ ते ७ अशा दोन टप्प्यांत राबविण्यात आली. यामध्ये शहरातील प्रमुख नाके आणि प्रवेशद्वारांवर नाकाबंदी करून तपासणी करण्यात आली. या मोहिमेत ४ आर.सी.पी. (RCP) प्लाटून्स, गुन्हे शोध पथकाचे (DB) ४ प्लाटून्स आणि शहर वाहतूक शाखेसह विविध पोलीस ठाण्यांमधील अधिकारी व अंमलदार सहभागी होते.

सर्व बसेसची सखोल झडती घेण्यात आली. चालक व वाहकांना कोणत्याही प्रकारचे अवैध अंमली पदार्थ, विनापरवाना शस्त्रास्त्रे किंवा प्रतिबंधित वस्तूंची वाहतूक न करण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बसमधील सुरक्षा मानकांचे निरीक्षण करण्यात आले. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ‘दोन चालक’ अनिवार्य असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्या ट्रॅव्हल्स मालकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला. त्याचबरोबर ई-चलन प्रणालीद्वारे तपासणी केली असता, वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनधारकांकडून घटनास्थळी २०,००० रुपयांचा थकीत दंड वसूल करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव) कविता नेरकर आणि अपर पोलीस अधीक्षक (जळगाव) संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. जिल्ह्यातील शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा भविष्यातही सातत्याने राबविल्या जातील, असा इशारा पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
जळगावात भाजपचा जल्लोष; ‘झालमुडी’चा आस्वाद घेत साजरा केला बंगाल-आसाममधील विजय!

जळगावात भाजपचा जल्लोष; ‘झालमुडी’चा आस्वाद घेत साजरा केला बंगाल-आसाममधील विजय!

ताज्या बातम्या

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी
खान्देश

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी

October 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add