• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 7, 2026
in जळगाव जिल्हा
0
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

​जळगाव, (प्रतिनिधी) : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला एलपीजी इंधनाचा तुटवडा आणि त्याचा गैरफायदा घेऊन सुरू असलेली चढ्या दराने विक्री, तसेच महाराष्ट्र शासनाकडून कल्याणकारी मंडळाच्या नावे होणारी सक्तीची वसुली या विरोधात जळगाव जिल्ह्यातील रिक्षाचालक आक्रमक झाले आहेत. ‘ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती’च्या वतीने बुधवार, ८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

आंदोलनामागची प्रमुख कारणे:
▪️​इंधन दरवाढ व काळाबाजार: शहरातील एलपीजी गॅस वितरक प्रति लिटर ११० ते १५० रुपये या चढ्या दराने विक्री करत असून, रिक्षाचालकांना आर्थिक फटका बसत आहे. ५५ रुपये दराने गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनेने केली आहे.
▪️​सक्तीची नोंदणी फी: कल्याणकारी मंडळाच्या सदस्य नोंदणीसाठी ८०० रुपये (५०० रुपये नोंदणी + ३०० रुपये वार्षिक वर्गणी) सक्तीने वसूल केले जात आहेत. ही फी रद्द होईपर्यंत रिक्षाचालक सदस्य होणार नाहीत, अशी भूमिका घेण्यात आली आहे.
▪️​कामात अडवणूक: नोंदणी केली नाही म्हणून रिक्षा पासिंग आणि परवाना नूतनीकरणाची कामे थांबवण्यात आली आहेत, त्याबाबत चालकांमध्ये तीव्र संताप आहे.

​प्रदेशाध्यक्ष शशांक राव आणि महासचिव विलास भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व रिक्षा संघटना, पदाधिकारी आणि चालकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन कार्याध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांनी केले आहे.

Next Post
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add