• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मोहफुलांच्या मूल्यवर्धनातून आदिवासी महिलांना मिळणार रोजगाराची नवी दिशा

रोटरी क्लब जळगाव आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे वैजापूर येथे कार्यशाळा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 27, 2026
in जळगाव जिल्हा
0
मोहफुलांच्या मूल्यवर्धनातून आदिवासी महिलांना मिळणार रोजगाराची नवी दिशा

जळगाव, (प्रतिनिधी) : मोहफुलांकडे केवळ दारू निर्मितीचे साधन म्हणून न पाहता, त्यापासून पौष्टिक पदार्थ बनवल्यास महिला सबलीकरणासोबतच उपजीविकेच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आदिवासी विकास विभाग यावलचे सहायक प्रकल्पाधिकारी सतिश पाटील यांनी व्यक्त केला.

रोटरी क्लब जळगाव आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ बनविण्याच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ​यावेळी व्यासपीठावर सरपंच दत्तर सिंग पावरा, वनरक्षक विजय शिरसाठ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतिश गोगुलवार, रोटरीचे अध्यक्ष गिरीश कुळकर्णी, सचिव सुभाष अमळनेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यशाळेत मोहफुलांचा चिवडा, मोहफुलांचे लाडू व केक बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेस ३८ आदिवासी भगिनींनी सहभाग घेतला आहे. दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप शुक्रवार, दि. २७ मार्च रोजी होणार आहे.

​डॉ. सतीश गोगुलवार यांचे आज जळगावात व्याख्यान
​कार्यशाळेचे मुख्य प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी पुरस्कार विजेते डॉ. सतीश गोगुलवार यांचे आज शुक्रवार, २७ मार्च रोजी सायंकाळी ७:३० वाजता जळगावात जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या विषयावर रोटरी हॉल, गणपती नगर येथे ते मार्गदर्शन करणार आहेत. गडचिरोलीत चार दशकांपासून आरोग्य आणि जल-जंगल-जमीन या विषयावर काम करणाऱ्या डॉ. गोगुलवार यांच्या विचारांचा लाभ घेण्याचे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि रोटरी क्लबने केले आहे.

Next Post
दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या; जिल्हापेठ पोलिसांकडून एक मोटारसायकल जप्त

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या; जिल्हापेठ पोलिसांकडून एक मोटारसायकल जप्त

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add