• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 10, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव पोलीस दलाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या ‘दक्षता’ पेट्रोल पंपावरील १ कोटी ३३ लाख रुपयांच्या बहुचर्चित अपहार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी, व्यवस्थापक तथा पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ हे अखेर सोमवारी (९ मार्च) पोलिसांना शरण आले. पोलिसांनी वाघ यांच्यासह त्यांचा मुलगा शेखर वाघ यालाही अटक केली असून, या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

​जळगाव पोलीस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत ‘दक्षता’ पेट्रोल पंप चालविला जातो. या पंपाच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांची संपूर्ण जबाबदारी व्यवस्थापक म्हणून वाल्मीक वाघ यांच्याकडे होती. ऑडिट दरम्यान पंपाच्या खात्यात १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांची तफावत असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी वाघ यांच्याविरुद्ध फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून वाघ हे फरार होते.

​गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस वाघ यांच्या मागावर होते. त्यांच्या शोधार्थ ठिकठिकाणी पथके रवाना करण्यात आली होती. मात्र, अटकेची टांगती तलवार आणि पोलिसांचा वाढता दबाव पाहता, सोमवारी वाल्मीक वाघ हे स्वतःहून स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि तपासाधिकारी राहुल गायकवाड यांनी त्यांची सखोल चौकशी केली. या गुन्ह्यात मुलाचाही सहभाग असल्याच्या संशयावरून शेखर वाघ यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

​चौकशी दरम्यान वाघ यांनी १.३३ कोटींचा अपहार केल्याचा आरोप नाकारला असून, ही रक्कम केवळ १० ते १५ लाख असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान एवढ्या मोठ्या रकमेची विल्हेवाट नेमकी कशी लावली आणि ती परत कशी हस्तगत करता येईल, या दिशेने पोलीस आता तपास चक्र फिरवत आहेत.

Tags: #petrolpumpCrimeJalgaonPolice
Next Post
विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम

विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add