• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 26, 2026
in जळगाव जिल्हा
0
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

जळगाव, (प्रतिनिधी) : जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे संस्थापक, श्रद्धेय भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी विविध प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मोठेभाऊ यांनी नेहमीच ‘अनुभूती’च्या विद्यार्थ्यांना ‘दादाजीं’च्या मायेचे छत्र आणि प्रेम दिले. याच आत्मीयतेच्या धाग्यातून अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांद्वारे ‘भक्ती संगीत संध्या’ हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन, प्राचार्य देबासिस दास, अनुराधा बेरा, विक्रांत जाधव, शुभदा नेवे, निरज शर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. ‘भाऊंच्या उद्यानात’ पार पडलेल्या या हृदयस्पर्शी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस भक्तीगीते सादर करून मोठ्याभाऊंना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. पांडुरंग नामी लागलासी ध्यास… या भक्तीगीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. देवा इंद्रायणी थांबला…, तुझ मे राम मुझ मे राम…मुझमे राम तुझमे राम सबमे राम समाये…, शोधिसी मानवा राउळी मंदिरी…, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी…, माझे माहेर पंढरी… अशी एकापेक्षा एक सरस भक्तीगीत अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सादर केली.

या संगीत संध्येतून केवळ गायनच नव्हे, तर मोठेभाऊंच्या जीवनमूल्यांचा जागर करण्यात आला. कार्यक्रमात देशाविषयीचा ममत्वभाव, पर्यावरणाविषयीची जागरूकता आणि मानवतेच्या नात्याने परस्परांविषयी आदर व आपुलकी जपण्याचा संदेश देण्यात आला. तसेच, सामाजिक बांधिलकीतून एका संवेदनशील समाज निर्मितीसाठीचे योगदान या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले. या स्वरमयी आदरांजलीने उपस्थितांचे मन जिंकून घेतले.

Next Post
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील 'स्थायी'चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add