• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात २६ फेब्रुवारीपासून ‘खान्देश महोत्सव’चा जागर; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 21, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
जळगावात २६ फेब्रुवारीपासून ‘खान्देश महोत्सव’चा जागर; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ

​जळगाव, (प्रतिनिधी) : स्थानिक महिला बचत गट, उद्योजक आणि स्वयंसहाय्यता गटांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिका आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खान्देश महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत शहरातील सागर पार्क मैदानावर हा महोत्सव पार पडणार असून, जळगावकरांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर दीपमाला काळे यांनी केले आहे.

​१८० स्टॉल्सवर खान्देशी संस्कृतीचे दर्शन..
या महोत्सवाचे हे सहावे वर्ष असून यंदा एकूण १८० स्टॉल्सची उभारणी करण्यात आली आहे. यात हस्तकला वस्तू, होम अप्लायन्सेस, ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने आणि ऑफिस डेकोरेटिव्ह वस्तूंचे दालन असणार आहे. विशेष म्हणजे खान्देशची ओळख असलेले अस्सल शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ खवय्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतील.

​मनोरंजनाची मेजवानी आणि बक्षिसांची लयलूट..
केवळ खरेदीच नव्हे, तर मनोरंजनासाठीही महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध अभिनेता ओम यादव यांच्या विशेष उपस्थितीत ‘पैठणी आणि राणीहार’ जिंकण्याची सुवर्णसंधी महिलांना मिळणार आहे. याशिवाय स्थानिक कलावंतांचे गायन, समूह नृत्य, लहान मुलांसाठी गेम झोन आणि जादूगाराचे प्रयोग अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्कृष्ट स्टॉल धारकांचा गौरवदेखील यावेळी केला जाणार आहे.

​पर्यावरणपूरक महोत्सवाचा संकल्प..
“स्थानिक भगिनींच्या हाताला काम मिळावे आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी हा यामागचा मुख्य उद्देश आहे,” असे महापौर दीपमाला काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच, यावर्षी महोत्सवात ‘प्लास्टिकमुक्ती’चा संदेश दिला जाणार असून नागरिकांना कापडी पिशव्या देण्याचे नियोजन असल्याचे उपमहापौर मनोज चौधरी यांनी स्पष्ट केले.

Tags: #municipalcorporationJalgaon
Next Post
शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात

शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add