• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाहुणचार घेऊन घरी परतताना घात; दुचाकीस्वारांनी वृद्धेच्या गळ्यातील सोनपोत ओरबाडली

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 1, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
पाहुणचार घेऊन घरी परतताना घात; दुचाकीस्वारांनी वृद्धेच्या गळ्यातील सोनपोत ओरबाडली

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील प्रेमनगर भागात शनिवारी (३० जानेवारी) रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. आपल्या पतीसह पायी घरी परतत असलेल्या निर्मला जनार्दन चौधरी (वय ६८, रा. प्रेमनगर) यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, निर्मला चौधरी आणि त्यांचे पती जनार्दन चौधरी हे नुकतेच नाशिक येथून जळगावला परतले होते. शहरात आल्यानंतर ते आपल्या नातेवाइकांकडे (भावाकडे) जेवणासाठी गेले होते. रात्री जेवण आटोपून दोघे पती-पत्नी पायी चालत आपल्या घराकडे जात असताना, पाठीमागून एका दुचाकीवर दोन तरुण आले. काही समजण्याच्या आतच, दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने निर्मला यांच्या गळ्यातील सोन्याच्या पोतीवर झडप घातली आणि ९० हजार रुपये किमतीचा ऐवज घेऊन दोन्ही चोरटे वेगाने पसार झाले.

​अचानक घडलेल्या या प्रकारामुळे चौधरी दांपत्य सुन्न झाले. त्यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत चोरटे दृष्टीआड झाले होते.

Tags: #jalgaon_cityCrimePolice
Next Post
एकजूट आणि न्याय: गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर

एकजूट आणि न्याय: गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर

ताज्या बातम्या

दहा गुन्ह्यांची उकल; पाच सराईत गुन्हेगार केले जेरबंद, ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
गुन्हे

दहा गुन्ह्यांची उकल; पाच सराईत गुन्हेगार केले जेरबंद, ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

July 9, 2026
कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

July 9, 2026
जळगावात २६ जुलैला वंजारी समाजातर्फे २४ वा गुणवंत विद्यार्थी व सेवागौरव सत्कार समारंभ
सामाजिक

जळगावात २६ जुलैला वंजारी समाजातर्फे २४ वा गुणवंत विद्यार्थी व सेवागौरव सत्कार समारंभ

July 8, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली
जळगाव जिल्हा

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
सेल्फीने घेतला जीव; खदाणीतील ३० फूट खोल पाण्यात बुडून ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव जिल्हा

सेल्फीने घेतला जीव; खदाणीतील ३० फूट खोल पाण्यात बुडून ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

July 8, 2026
१० वर्षीय बालिकेच्या डायबेटिक किटोअ‍ॅसिडोसिसवर यशस्वी उपचार
आरोग्य

१० वर्षीय बालिकेच्या डायबेटिक किटोअ‍ॅसिडोसिसवर यशस्वी उपचार

July 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group