• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चोपड्याच्या जिरायत पाडा येथे अंनिसतर्फे चमत्कारांचे सादरीकरण, प्रबोधन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 18, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
चोपड्याच्या जिरायत पाडा येथे अंनिसतर्फे चमत्कारांचे सादरीकरण, प्रबोधन

चोपडा, (प्रतिनिधी) : आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) चोपडा शाखेतर्फे नुकतेच एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दि. १६ जानेवारी रोजी तालुक्यातील जिरायत पाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तथा आश्रम शाळेत हा कार्यक्रम पार पडला.

दुपारी ३ ते ५ या वेळेत रंगलेल्या या कार्यक्रमात अंनिसचे चोपडा शाखा कार्याध्यक्ष डॉ.अय्युब आर. पिंजारी यांनी विविध ‘चमत्कार’ करून दाखवले आणि त्यामागील वैज्ञानिक कारणे स्पष्ट केली. यामध्ये प्रामुख्याने जिभेतून त्रिशूल आरपार करणे, पाण्याचा दिवा लावणे, गोड बाबाचा चमत्कार, पाण्याचा अखंड झरा, दारूपासून दूध बनविणे हे प्रयोग पाहून विद्यार्थी आणि ग्रामस्थ थक्क झाले होते. “बुवाबाजी आणि चमत्कारांच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबवण्यासाठी प्रत्येकाने वैज्ञानिक विचार करणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन डॉ. पिंजारी यांनी यावेळी केले.

या शिबिरात डॉ. पिंजारी यांच्यासोबत अंनिसचे कार्यकर्ते संजय पीरा अहिरे आणि अनिल गोरख वाडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील, शिक्षक प्रमोद देवरे, तसेच बिलदार पावरा, मगन बारेला, प्रताप बारेला आणि शिवाजी आव्हाड यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे परिसरातील पालकांनी आणि शिक्षणप्रेमींनी कौतुक केले आहे.

ताज्या बातम्या

चोपड्याच्या जिरायत पाडा येथे अंनिसतर्फे चमत्कारांचे सादरीकरण, प्रबोधन
जळगाव जिल्हा

चोपड्याच्या जिरायत पाडा येथे अंनिसतर्फे चमत्कारांचे सादरीकरण, प्रबोधन

January 18, 2026
एसटी प्रशासनाचा ‘रामभरोसे’ कारभार; डोळ्यासमोर बस असूनही चौकशी खिडकीतून प्रवाशांची दिशाभूल!
खान्देश

एसटी प्रशासनाचा ‘रामभरोसे’ कारभार; डोळ्यासमोर बस असूनही चौकशी खिडकीतून प्रवाशांची दिशाभूल!

January 18, 2026
जळगावात २३ जानेवारीपासून ‘बहिणाबाई महोत्सवा’चा जागर; खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाची मेजवानी
खान्देश

जळगावात २३ जानेवारीपासून ‘बहिणाबाई महोत्सवा’चा जागर; खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाची मेजवानी

January 18, 2026
“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे
खान्देश

“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे

January 17, 2026
आमदार भोळेंचा ऐतिहासिक करिष्मा; कर्जमुक्त महापालिका ते ‘क्लीन स्वीप’ विजय
जळगाव जिल्हा

आमदार भोळेंचा ऐतिहासिक करिष्मा; कर्जमुक्त महापालिका ते ‘क्लीन स्वीप’ विजय

January 17, 2026
भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता
जळगाव जिल्हा

भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता

January 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group