जळगाव, (प्रतिनिधी) : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग १२ ‘अ’ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार ललितकुमार घोगले यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, त्यांना मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सुशिक्षित चेहरा, संयमी स्वभाव आणि विकासाचे स्पष्ट व्हिजन यामुळे घोगले यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
विकासाचे व्हिजन अन् सुसंस्कृत नेतृत्व..
महाबळ कॉलनीतील रहिवासी आशिष देशपांडे म्हणाले की, “आम्हाला असा लोकप्रतिनिधी हवा आहे ज्याला प्रभागातील तांत्रिक प्रश्नांची जाण असेल. ललितकुमार घोगले हे अतिशय सुसंस्कृत व्यक्तिमत्व असून ड्रेनेज आणि अंतर्गत रस्त्यांचे प्रलंबित प्रश्न तेच मार्गी लावू शकतात, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.”
तरुणांचा ‘तुतारी’ला पाठिंबा..
तरुणांमध्येही ललितकुमार घोगले यांची विशेष क्रेझ पाहायला मिळत आहे. अक्षय पाटील यांनी सांगितले की, “खेळाची मैदाने आणि डिजिटल लायब्ररी यांसारख्या आधुनिक सुविधांसाठी घोगले यांचे व्हिजन आम्हाला प्रभावित करून गेले. तरुण पिढी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.”
प्रलंबित प्रश्नांच्या सुटीसाठी घोगले हाच पर्याय
रामानंद नगर भागातील सुवर्णाताई पाटील यांनी स्वच्छतेच्या मुद्द्यावर भाष्य केले. “पथदिवे आणि स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. घोगले हे नेहमीच सर्वसामान्यांच्या फोनला प्रतिसाद देतात, त्यामुळे आमचा पाठिंबा तुतारीलाच आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. तर जी. डी. महाजन यांनी “शरद पवार साहेबांच्या विचारांचा वारसा आणि ललितभाऊंची कार्यक्षमता यामुळे प्रभागाचा कायापालट निश्चित आहे,” असा विश्वास व्यक्त केला.








