• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रभाग १६ मध्ये भाजपचे ‘कमळ’ फुलवण्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन

​खा. स्मिता वाघ यांची उपस्थिती; रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 9, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
प्रभाग १६ मध्ये भाजपचे ‘कमळ’ फुलवण्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गुरुवारी प्रभाग क्रमांक १६ मधील भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने संपूर्ण परिसर भाजपमय झाला होता. खासदार स्मिता वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या रॅलीला मतदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

​नियोजनाबद्ध प्रचार रॅली रॅलीचा प्रारंभ सकाळी ८ वाजता हॉटेल इंपिरिया येथून उत्साहात झाला. यावेळी भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. विश्वनाथ खडके (१६ अ), वंदना संतोष इंगळे (१६ ब), रंजना विजय वानखेडे (१६ क) आणि सुनील वामनराव खडके (१६ ड) यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या. काशिनाथ लॉजपासून सुरू झालेली ही रॅली गुरुकुल, अपनाघर कॉलनी, दिलीप काका यांचे निवासस्थान, रेमंड कॉलनी, संतोषभाऊ इंगळे यांचे निवासस्थान, धनुशकु मेडिकल परिसर आणि एम.एस.ई.बी. कार्यालय या मार्गाने मार्गस्थ झाली.

​विकासाचे व्हिजन आणि विश्वास.
प्रचारादरम्यान उमेदवारांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन मांडले. “प्रभागातील रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि मूलभूत सुविधांना आमचे प्राधान्य असेल,” असा शब्द उमेदवारांनी दिला. ठिकठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून स्वागत केले, तर कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसरातील वातावरण ढवळून निघाले होते.

​आरती आणि विजयाचा संकल्प
या रॅलीचे नेटके नियोजन भाजप मंडळ ४ चे सरचिटणीस किसन भगवान मराठे यांनी केले होते. रॅलीचा समारोप अपनाघर येथील हनुमान मंदिरात करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आणि उमेदवारांनी सामूहिक आरती केली आणि विजयाचा संकल्प सोडून रॅलीची सांगता केली. या रॅलीत भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Next Post
प्रभाग ७ ‘ड’ मध्ये महायुतीची सरशी; चंद्रशेखर अत्तरदेंच्या प्रचारात महिला-तरुणांचा उत्स्फूर्त पाठिंबा

प्रभाग ७ 'ड' मध्ये महायुतीची सरशी; चंद्रशेखर अत्तरदेंच्या प्रचारात महिला-तरुणांचा उत्स्फूर्त पाठिंबा

ताज्या बातम्या

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम
आरोग्य

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम

May 30, 2026
आय.पी.एल. चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!
क्रिडा

आय.पी.एल. चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!

May 30, 2026
चोपड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हे

चोपड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हा दाखल

May 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group