• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भाजप उमेदवारांच्या रॅलीला प्रभाग ७ मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; चंद्रशेखर अत्तरदे यांच्याकडून विजयाचा निर्धार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 6, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
भाजप उमेदवारांच्या रॅलीला प्रभाग ७ मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; चंद्रशेखर अत्तरदे यांच्याकडून विजयाचा निर्धार

​जळगाव, (प्रतिनिधी) : निवडणुकीचे वारे वाहू लागताच जळगावमधील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. प्रभाग ७ ‘ड’ मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारासाठी आज सकाळी भव्य रॅली काढण्यात आली. गणेश कॉलनीसह प्रभागातील विविध परिसरात या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

​प्रचारादरम्यान उमेदवारांनी प्रभागातील विविध गल्ल्यांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. या रॅलीत प्रभाग ७ चे भाजपचे चारही उमेदवार दीपमाला काळे, अंकिता पाटील, विशाल भोळे आणि चंद्रशेखर अत्तरदे यांनी एकत्र येत शक्तीप्रदर्शन केले. त्यांच्यासोबत पक्षाचे पदाधिकारी चेतन तिवारी, मयूर भोळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

​रॅलीमध्ये तरुणांचा सहभाग आणि उत्साह विशेष लक्षणीय ठरला. ठिकठिकाणी स्थानिक महिलांनी उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचे औक्षण करून आणि पुष्पहार घालून स्वागत केले. “प्रभागाचा विकास आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी भाजप हाच सक्षम पर्याय आहे,” असे मत यावेळी मतदारांनी व्यक्त केले.

​यावेळी बोलताना चंद्रशेखर अत्तरदे म्हणाले की, “प्रभागातील रस्ते, पाणी आणि स्वच्छतेचे प्रश्न मार्गी लावणे ही आमची प्राथमिकता आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि केंद्रातील व राज्यातील योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना साथ द्यावी.”


 

Tags: #elections#jalgaon_cityBjp
Next Post
शिवसेनेचे (उबाठा) जोरदार शक्तीप्रदर्शन; कुलभूषण पाटील व उज्वला पाटील यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेनेचे (उबाठा) जोरदार शक्तीप्रदर्शन; कुलभूषण पाटील व उज्वला पाटील यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add