• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव मनपा रणसंग्राम: महायुती आज प्रचाराचे ‘रणशिंग’ फुंकणार; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची प्रमुख उपस्थिती

सायंकाळी शिवतीर्थावर महायुतीची विराट जाहीर सभा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 4, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
जळगाव मनपा रणसंग्राम: महायुती आज प्रचाराचे ‘रणशिंग’ फुंकणार; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची प्रमुख उपस्थिती

​जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, महायुतीच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ आज रविवार, ४ जानेवारी रोजी होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळा येथील भवानी मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडला जाणार असून, त्यानंतर सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवतीर्थ) येथे महायुतीची प्रचंड जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेच्या माध्यमातून महायुती निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे.

महानगरपालिकेच्या ७५ ही जागांवर महायुतीने कंबर कसली असून, या शक्तीप्रदर्शनासाठी राज्यातील व जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते एकाच मंचावर येणार आहेत. यामध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, माजी मंत्री संजय सावकारे, खा. स्मिता वाघ, माजी मंत्री आ. अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आ. सुरेश भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. किशोर पाटील, आ. अमोल जावळे, आ. चंद्रकांत पाटील आणि आ. अमोल पाटील यांच्यासह महायुतीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

प्रचाराचा शुभारंभ पिंप्राळा येथील भवानी माता मंदिरात सायंकाळी ५ वाजता धार्मिक विधी व नारळ फोडून होईल. त्यानंतर सर्व नेत्यांच्या उपस्थितीत शहरातील मुख्य केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य जाहीर सभा होईल. या सभेसाठी भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि रिपाइं (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्यासह महायुतीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.

जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प सोडत महायुतीने या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक सभेला महायुतीचे सर्व ७५ उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विष्णू भंगाळे आणि संजय पवार यांनी केले आहे. या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, महायुती या माध्यमातून प्रचारात आघाडी घेण्याच्या तयारीत आहे.

Tags: #elections#jalgaon_city#municipalcorporation
Next Post
पिंप्राळ्यात मशाल धगधगली! कष्टभंजन हनुमंताला साकडे घालून शिवसेना (उबाठा) उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला

पिंप्राळ्यात मशाल धगधगली! कष्टभंजन हनुमंताला साकडे घालून शिवसेना (उबाठा) उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’
जळगाव जिल्हा

जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’

June 4, 2026
डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय
जळगाव जिल्हा

डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

June 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group