• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव पोलीस दलाची कारवाई; १९ गुन्ह्यांमधील ७१० किलो गांजा नष्ट!

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 24, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगाव पोलीस दलाची कारवाई; १९ गुन्ह्यांमधील ७१० किलो गांजा नष्ट!

​जळगाव, (प्रतिनिधी) : मानवी आरोग्याला घातक ठरणाऱ्या आणि तरुणाईला नशेच्या विळख्यात ओढणाऱ्या अंमली पदार्थांविरुद्ध जळगाव जिल्हा पोलीस दलाने कठोर पाऊल उचलले आहे. एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यांतर्गत जिल्ह्यातील विविध १९ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल ७०९.२८० किलोग्रॅम गांजा आज, २४ डिसेंबर रोजी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला.

​सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस महासंचालक (महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कार्यवाही करण्यात आली. यासाठी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली ‘जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समिती’ स्थापन करण्यात आली होती. जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या मागील मोकळ्या जागेत ही प्रक्रिया राबवण्यात आली. समितीचे अध्यक्ष डॉ. महेश्वर रेड्डी, सदस्य अपर पोलीस अधीक्षक अशोक नाखाते आणि पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या उपस्थितीत जप्त मुद्देमालाच्या कागदपत्रांची कसून पडताळणी करण्यात आली. त्यानंतर दोन शासकीय पंचांसमक्ष आणि सहाय्यक कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांच्या देखरेखीखाली खड्डा खोदून हा सर्व गांजा नष्ट करण्यात आला. पारदर्शकतेसाठी या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले आहे.

​ही महत्त्वाची कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय दोरकर, संदीप पाटील, सुनील दामोदरे, संदीप चव्हाण, जयंत चौधरी, राहुल बैसाने, रवींद्र चौधरी, नीता राजपूत आणि चालक दर्शन ढाकणे या पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला. तसेच वजनमापे निरीक्षक राजेंद्र व्यवहारे यांची देखील यावेळी उपस्थिती होती.

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
मिशन जळगाव मनपा: गुलाबराव पाटील यांची मोठी घोषणा; भाजप-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब

मिशन जळगाव मनपा: गुलाबराव पाटील यांची मोठी घोषणा; भाजप-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब

ताज्या बातम्या

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद
खान्देश

समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद

January 12, 2026
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात
खान्देश

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात

January 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group