• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वसा जनसेवेचा, तरुण व्यक्तिमत्व पंकज पाटील : नवीन व्हिजन, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मूलभूत विकास साधणार

जळगावात प्रभाग ७ मध्ये विकासपर्वासाठी इच्छुक उमेदवार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 23, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
वसा जनसेवेचा, तरुण व्यक्तिमत्व पंकज पाटील : नवीन व्हिजन, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मूलभूत विकास साधणार

जळगाव (प्रतिनिधी) : निवडणूक येते आणि जाते. पण आपला परिसर आणि आपली माणसं कायम राहतात. राजकारण हे समाजाला जोडण्यासाठी असावे, तोडण्यासाठी नाही. म्हणूनच, मी तुमच्यासमोर केवळ एक उमेदवार म्हणून नाही, तर तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून येत आहे, अशा शब्दांत प्रभाग ७ येथील इच्छुक उमेदवार पंकज सुरेश पाटील यांनी माझा संकल्प स्पष्ट आहे, असे सांगितले. जातीपातीच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला न्याय मिळवून देणे, मूलभूत विकासाला तंत्रज्ञानाची जोड देऊन विकासपर्व घडवून आणण्याची इच्छा असल्याचे पंकज पाटील यांनी सांगितले.

पंकज सुरेश पाटील यांनी २०१३ साली खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून तत्कालीन प्रभाग क्रमांक १८ म्हणजेच आजचा प्रभाग क्रमांक ७ येथून मी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत दीड हजारपेक्षा अधिक मते मिळाली होती. तर २०१८ साली त्यांची सुविद्य पत्नी नामे अंकिता पंकज पाटील या शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढल्या होत्या. प्रभाग क्रमांक ७ ब मध्ये त्यांना क्रमांक २ ची मते २४५१ अशी मिळाली होती. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आता प्रभाग क्रमांक ७ मध्ये मायबाप जनतेच्या पाठिंब्याने संधी मिळाली तर नक्कीच त्याचे सोने करून दाखवेल, अशी ग्वाही पंकज पाटील यांनी दिली आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणे, अडकलेली विकासकामे मार्गी लावून आपल्या भागाचा कायापालट करणे हे महत्वाचे उद्दिष्ट पंकज पाटील यांचे आहे.

तुमच्या एका मतामध्ये मोठी ताकद आहे. हे मत कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता, केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्यावर द्या. मी शब्द देतो, आपला विश्वास सार्थ ठरवेन, असे पंकज पाटील म्हणतात. हॉटेल व्यवसायिक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. शिवनेरी ग्रुपच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून प्रभागात केलेले समाजकार्य नागरिकांना परिचित आहे. माजी नगरसेवक विनायकभाऊ सोनवणे यांचा जनसेवेचा वसा त्यांना पुढे न्यायचा मानस आहे.

पंकज पाटील यांचे विकासाचे व्हिजन..
१) मूलभूत सुविधा आणि विकास : वॉर्डातील जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यावर आणि परिसराचे आधुनिकीकरण करण्यावर माझे संपूर्ण लक्ष राहील. यामध्ये रस्ते, वीज, पाणी यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
२) पाणीपुरवठा आणि स्वच्छता : सर्व घरांना पुरेसा, नियमित आणि पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करणे. जुन्या जलवाहिन्या बदलणे याकडे लक्ष दिले जाईल.
३) उत्कृष्ट रस्ते आणि वाहतूक : वॉर्डातील सर्व मुख्य व अंतर्गत रस्ते सिमेंटचे/डांबरीकरण करणे. प्रभागातील काही रस्ते अद्यापही सिमेंटचे झालेली नाही. त्यासाठी प्रयत्न करणे याकरता पाठपुरावा करणार आहे.
४) कचरा व्यवस्थापन सुधारणा : ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न राहील. घंटागाडी व्यवस्थापकांच्या समन्वयाने कचरा संकलनाची वेळ आणि नियमितता यामध्ये सुधारण्यासाठी प्रयत्न करत राहील.
५) सुरक्षित आणि सुंदर परिसर : वॉर्डातील सर्व सार्वजनिक ठिकाणी पुरेसे पथदिवे बसवणे, उद्याने, बागांची निर्मिती किंवा सुधारणा करणे, प्रभागाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाशी समन्वय साधणे, महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी जनजागृती करणे, चौकात मधील विद्रुपता नष्ट करून त्याला सुंदर बनवणे आदी मानस आहे.
६) सामाजिक कल्याण आणि शिक्षण : यात मला नागरिकांचे जीवनमान उंचावणे आणि सामाजिक समस्यांवर काम करणे अपेक्षित आहे. महानगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता सुधारणे, डिजिटल शिक्षण सुविधा उपलब्ध करणे, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारणे, शालेय अडचणी सोडवणे, प्रभागातील मानसिक आरोग्य चांगले राहील यासाठी प्रसंगी सर्वेक्षण करून उपाययोजना करणे हे माझे ध्येय आहे.
७) आरोग्य सेवा सुधारणा : वॉर्डातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधे आणि डॉक्टरांची उपलब्धता वाढवणे. नियमित आरोग्य शिबिरे आयोजित करणे, महानगरपालिकेच्या माध्यमातून “आपला दवाखाना” विकसित करणे, प्रभागातील मध्यमवर्गीय व गरीब जनतेला प्रसंगी आरोग्य सुविधेसाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
८) महिला व युवा सशक्तीकरण : महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रे सुरू करणे, तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन आणि क्रीडा सुविधा उपलब्ध करणे, अभ्यासिका उभारणे, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
९) ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मदत : त्यांच्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करणे, हे उद्देश.
१०) नागरिक-केंद्रित प्रशासन : दर महिन्याला ‘वॉर्ड सभा’ आयोजित करणे, जेणेकरून नागरिक थेट समस्या मांडू शकतील. तक्रार निवारणासाठी प्रभावी ऑनलाइन/ऑफलाइन यंत्रणा तयार करणे, वॉर्डात सुरू असलेल्या विकास कामांची माहिती लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सहज उपलब्ध करून देणार आहे.
११) जनसंपर्क : नियमितपणे नागरिकांना भेटण्यासाठी वेळ देणे आणि त्यांच्यासाठी कार्यालय खुले करणे. स्वतःचा संपर्क क्रमांक आणि माहिती सहज उपलब्ध ठेवणार आहे. तुमच्या कार्यकाळात तुम्ही पूर्ण केलेल्या कामांचा तपशीलवार ‘अहवालपत्र’ दरवर्षी नागरिकांसमोर सादर करेल.


 

Tags: #jalgaon_city#political#shivcoloniBjp
Next Post
क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने लेखापरीक्षकाला ४९ हजारांचा गंडा

क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने लेखापरीक्षकाला ४९ हजारांचा गंडा

ताज्या बातम्या

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद
खान्देश

समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद

January 12, 2026
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात
खान्देश

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात

January 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group