• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 15, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय

जळगाव, ​(प्रतिनिधी) : तालुक्यातील निमखेडी येथे रविवारी (१४ डिसेंबर) रात्री धक्कादायक घटना समोर आली आहे. सागर साहेबराव सोनवणे (वय २७) या तरुणाची डोक्यात धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या करण्यात आली आहे. या खळबळजनक घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

​रविवारी रात्रीच्या सुमारास मारेकऱ्यांनी सागर सोनवणे याच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. ​डोक्यात गंभीर वार झाल्यानंतर त्याला निमखेडी गावातील राममंदिराच्याजवळ गंभीर जखमी अवस्थेत फेकून देण्यात आले. ​घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तातडीने सागरला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. ​मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

​अनैतिक संबंधातून हत्येचा संशय..
​मृत सागरच्या पश्चात त्याचे आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. प्राथमिक तपासात या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, तालुका पोलिसांनी अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला आहे.

​या खून प्रकरणी तालुका पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली असून, घटनेचा पुढील तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणातील सत्य आणि आरोपींना लवकरच पकडण्यात यश येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Tags: #nimkhediCrimeJalgaonPolice
Next Post
खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!

खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!

ताज्या बातम्या

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add