• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावमध्ये थंडीचा कहर! पारा थेट ७ अंशांवर, सहा वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 12, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
जळगावमध्ये थंडीचा कहर! पारा थेट ७ अंशांवर, सहा वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद

​जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांनी ऊब घेण्यासाठी शेकोट्या पेटवण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद १० डिसेंबर रोजी करण्यात आली. ​नोव्हेंबर महिन्यात रात्रीचा तापमानाचा पारा थेट ७.१ अंशांपर्यंत खाली घसरला होता, तर आता डिसेंबर महिन्यात पहिल्यांदाच तापमानाचा पारा ७ अंशांवर गेला आहे. गेल्या ६ वर्षांतील डिसेंबर महिन्यातील हा सर्वात कमी तापमानाचा रेकॉर्ड आहे.

​जळगाव आणि नाशिक येथे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली, दोन्ही शहरांचे तापमान ७ अंशांवर इतके होते. याआधी २०१९ मध्ये डिसेंबर महिन्यात पारा ६.४ अंशावर गेला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो ७.४ अंशांपर्यंत खाली आला होता. उत्तरेकडील वारे मोठ्या प्रमाणात सक्रिय असून हवामान पूर्णपणे कोरडे असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे.

​हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आगामी दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे. पारा ८ अंशांच्या खालीच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोन दिवसांनंतर तापमानात थोडाफार चढ-उतार होण्याची शक्यता आहे. ​नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
​

Next Post
बालरंगभूमी परिषदेतर्फे ज्ञानेश्वर गायकवाड यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

बालरंगभूमी परिषदेतर्फे ज्ञानेश्वर गायकवाड यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

ताज्या बातम्या

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद; डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा पुढाकार
जळगाव जिल्हा

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद; डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा पुढाकार

May 6, 2026
मध्यप्रदेशातील आंतरराज्य टोळी जेरबंद; विमानतळ परिसरातील घरफोडीचा लागला छडा
गुन्हे

मध्यप्रदेशातील आंतरराज्य टोळी जेरबंद; विमानतळ परिसरातील घरफोडीचा लागला छडा

May 6, 2026
भाजप महिला कार्यकर्त्यांबद्दल फेसबुकवर अश्लील कमेंट; पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी
गुन्हे

भाजप महिला कार्यकर्त्यांबद्दल फेसबुकवर अश्लील कमेंट; पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी

May 6, 2026
सीईओ करिश्मा नायर यांचा रावेर दौरा; ग्रामपंचायत ते आरोग्य केंद्रापर्यंत कामकाजाचा घेतला आढावा
जळगाव जिल्हा

सीईओ करिश्मा नायर यांचा रावेर दौरा; ग्रामपंचायत ते आरोग्य केंद्रापर्यंत कामकाजाचा घेतला आढावा

May 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

May 6, 2026
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध
जळगाव जिल्हा

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

May 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group