• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाचे खिसे कापणारे तिघे अटकेत! ₹१५,००० रोख हस्तगत

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहिती ठरली निर्णायक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 10, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाचे खिसे कापणारे तिघे अटकेत! ₹१५,००० रोख हस्तगत

​जळगाव, (प्रतिनिधी) : बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाच्या खिशातील रोकड लंपास करणाऱ्या तीन पाकीटमारांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेली संपूर्ण ₹१५,००० रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, यावल येथील रहिवासी शेख कलीम शेख इसाक (वय ५०) हे ०१ डिसेंबर रोजी पत्नीच्या औषधोपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात आले होते. औषधे घेऊन घरी परतण्यासाठी ते जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथून बसमध्ये चढत असताना, त्यांच्या पाठीमागून आलेल्या अनोळखी इसमाने त्यांच्या पॅन्टच्या खिशातील ₹१५,०००/- रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​या गंभीर घटनेची दखल घेऊन, पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला तात्काळ आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, पथकातील अंमलदारांनी गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण करून आरोपींची ओळख पटवली. ​या माहितीच्या आधारावर, रजा कॉलनी परिसरातील रहिवासी असलेले खालील तीन आरोपी निष्पन्न झाले. यात हमीद अय्युब खान (वय २२, रा. बाम्बे बेकरी जवळ, अक्सा नगर, जळगाव), समीर खान अफसर खान (वय २२, रा. शेरा चौक, जळगाव), शोहेब मेहमुद पटेल (वय २३, रा. शेरा चौक, रजा कॉलनी, जळगाव) ​या तिघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांनी चोरलेली ₹१५,०००/- रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.

​सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ​कारवाई पथकात पोउपनि राहुल तायडे, पोउपनि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, किरण पाटील, गिरीष पाटील, प्रदिप चौधरी, विशाल कोळी यांचा समावेश होता. पुढील तपास पोहेकॉ गिरीष पाटील हे करीत आहेत.

Tags: CrimePolice
Next Post
निंभोरा पोलीस स्टेशनचा हवालदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

निंभोरा पोलीस स्टेशनचा हवालदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add