• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हृदयद्रावक घटना! हाय-व्होल्टेज शॉकने बाप-लेकीचा मृत्यू; भाची गंभीर जखमी

महावितरणच्या दुर्लक्षावर नातेवाईकांकडून संताप

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 6, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
हृदयद्रावक घटना! हाय-व्होल्टेज शॉकने बाप-लेकीचा मृत्यू; भाची गंभीर जखमी

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील मास्टर कॉलनी परिसरात, शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी उच्च दाबाच्या (हाय-व्होल्टेज) विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील बाप आणि मुलगी अशा दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर १६ वर्षीय भाची गंभीर जखमी झाली आहे. महावितरणने परिसरातील धोकादायक विद्युत वाहिनी हटवण्याच्या मागणीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे ही भीषण दुर्घटना घडल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केला आहे.

​मास्टर कॉलनी येथे राहणारे मौलाना साबीर खान नवाझ खान (वय ३८) हे कुटुंबासह वास्तव्यास होते. शुक्रवारी सकाळी अंदाजे १०.३० वाजताच्या सुमारास त्यांची भाची मारिया फतेमाबी (वय १६) ही घराच्या गच्चीवर कपडे टाकण्यासाठी गेली होती. गच्चीजवळून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत तारेचा तिला जोरदार धक्का बसला. ​भाचीला विजेचा धक्का बसलेला पाहून मौलाना साबीर खान यांची मोठी मुलगी आलिया (वय १२) तिला वाचवण्यासाठी पुढे झाली, मात्र तिलाही विजेचा जोरदार धक्का बसला. या दोघींनाही वाचवण्यासाठी मौलाना साबीर खान यांनी धाव घेतली, परंतु दुर्दैवाने त्यांनाही विजेचा जबरदस्त धक्का बसला आणि तिघेही गंभीर जखमी झाले.

​बाप-लेकीचा जागीच मृत्यू..
​या हृदयद्रावक घटनेत मौलाना साबीर खान (वय ३८) आणि त्यांची मोठी मुलगी आलिया (वय १२) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने मास्टर कॉलनी परिसरात शोककळा पसरली आहे. गंभीर जखमी झालेली भाची मारिया फतेमाबी हिला तातडीने नजीकच्या सारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. सुदैवाने मौलाना साबीर खान यांचा लहान मुलगा या दुर्घटनेतून थोडक्यात बचावला.

महावितरणच्या भोंगळ कारभारावर संताप..
​या दुर्घटनेनंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी नातेवाईकांनी महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. गेल्या काही महिन्यांपासून घराजवळून गेलेली ही उच्च दाबाची धोकादायक विद्युत वाहिनी हटवण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी वारंवार केली होती, परंतु महावितरणने या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

​


 

Next Post
‘बंपर नफ्या’च्या आमिषाला बळी! शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली १९ लाखांना गंडा

'बंपर नफ्या'च्या आमिषाला बळी! शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली १९ लाखांना गंडा

ताज्या बातम्या

रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवात नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि ‘बॉलीवूड घराना’ची मेजवानी
जळगाव जिल्हा

रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवात नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि ‘बॉलीवूड घराना’ची मेजवानी

November 27, 2026
बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
खान्देश

बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

November 27, 2026
कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ
गुन्हे

कजगाव गोळीबार प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 27, 2026
रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
खान्देश

रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

November 27, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

शिवशाही बसमध्ये महिलेच्या बॅगेतून ४.६३ लाखांचा ऐवज लंपास

November 27, 2026
जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन; चित्रपटांची व जादूची दुहेरी मेजवानी
खान्देश

जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन; चित्रपटांची व जादूची दुहेरी मेजवानी

November 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add