एरंडोल, (प्रतिनिधी) : एरंडोल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर महायुतीने जोरदार प्रचार सुरू केला आहे. रविवारी एरंडोल शहरातील प्रभाग क्र. ५ आणि ८ मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ एका भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या माध्यमातून आमदार अमोलदादा पाटील यांनी जनतेच्या भेटी-गाठी घेत संवाद साधला आणि निवडणुकीसाठी शुभाशिर्वाद घेतले.
आमदार अमोलदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकुर, प्रभाग क्र. ५ अ च्या उमेदवार सत्यभामाबाई माधवराव पाटील, प्रभाग क्र. ५ ब चे उमेदवार प्रा. मनोज पाटील, प्रभाग क्र. ८ अ च्या उमेदवार भारती मनोज गुर्जर, आणि ब च्या उमेदवार पौर्णिमा महेश देवरे यांचा समावेश होता. उमेदवारांनी नागरिकांकडून खंबीर पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली.
या प्रचार रॅलीला जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जि.प. माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, तालुकाप्रमुख रवि जाधव, माजी नगराध्यक्ष राजु चौधरी, एस.आर. पाटील, खडके येथील जगदीश पाटील, भैय्या गुजर, आबासाहेब ठाकुर, पाटील समाज अध्यक्ष मंगेश पाटील, संतोष ठाकुर, सुभाष मराठे, नारायण ठाकुर, प्रकाश ठाकुर, ज्ञानेश्वर मराठे, जगदिश जगताप, पंडित पाटील, नामदेव पाटील, सुभाष बाबुलाल मराठे, आकाश ठाकुर, पिंटू मावळे, भैय्या पाटील, सोनु ठाकुर, हरी ठाकुर, शहरप्रमुख बबलु चौधरी यांच्यासह शिवसेना-भाजपा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने शहरवासीय रॅलीत सहभागी झाले होते.
महायुतीच्या या प्रचारामुळे एरंडोलच्या राजकीय वातावरणात कमालीची ऊर्जा संचारली असून, ही रॅली महायुतीसाठी निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.








