• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भव्य रॅलीने एरंडोलमध्ये ‘युती’चा झंझावात!

आ.अमोल पाटलांच्या उपस्थितीत डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्यासह उमेदवारांसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 23, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
भव्य रॅलीने एरंडोलमध्ये ‘युती’चा झंझावात!

आ.अमोल पाटलांच्या उपस्थितीत डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्यासह उमेदवारांसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन

​एरंडोल, (प्रतिनिधी) : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एरंडोल शहरात भाजप-सेना युतीच्या प्रचाराने शनिवारी गती घेतली. एरंडोल-पारोळा तालुक्याचे आमदार अमोलदादा चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्यासह प्रभाग क्र. ९ व प्रभाग क्र. १० मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या शक्तिप्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

​रॅली आणि प्रचार कार्यालयाचे उद्घाटन..
​या भव्य प्रचार रॅलीमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्यासोबतच प्रभाग क्र. ९ चे उमेदवार नितेश कैलाश चोधरी आणि जिजाबाई वसंत पाटील, तसेच प्रभाग क्र. १० चे उमेदवार मनकार्नाबाई चैत्राम चोधरी आणि नोएम खॉं दलशेरखॉ सहभागी झाले होते. आमदार अमोलदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या रॅलीमुळे एरंडोलमधील वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले.

​त्याचप्रमाणे, निवडणूक प्रचाराला अधिक बळ देण्यासाठी प्रभाग क्र. ११ आणि प्रभाग क्र. ७ मधील प्रचार कार्यालयांचे उद्घाटनही याच दिवशी संपन्न झाले. याप्रसंगी आमदार अमोलदादा पाटील यांनी बोलताना युतीच्या उमेदवारांना मतदार राजाने संधी दिल्यास, नक्कीच शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला. या रॅलीमुळे एरंडोलमधील युतीच्या बाजूने जोरदार वातावरण निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती..
​या महत्वपूर्ण प्रचार दौऱ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने किशोर काळकर, रमेश परदेशी, रवींद्र महाजन, मनोज पाटील, अशोक चौधरी, संजू साळी, आर्शिवाद पाटील, राजुआबा चौधरी, बबलू चौधरी, किशोर चौधरी, प्रकाश ठाकूर, चंदू जोहरी, गुड्डू जोहरी, दशरथ चौधरी, सुनील चौधरी, मालती अमोल वाणी, संजय सुरेश पाटील, मंजुळाबाई नत्थू चौधरी, धनंजय खैरनार, अतुल मराठे यांचा समावेश होता. या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी युतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

​

Tags: #politicalerandol
Next Post
स्टार्टअप उद्योजकांना मिळाले ४० कोटींचे अर्थसहाय्य; लीड बँकेचा उपक्रम

स्टार्टअप उद्योजकांना मिळाले ४० कोटींचे अर्थसहाय्य; लीड बँकेचा उपक्रम

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add