• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

देहविक्री प्रकरणी जळगावातील हॉटेल तारावर पोलिसांची धाड; तीन महिलांची सुटका

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 21, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
देहविक्री प्रकरणी जळगावातील हॉटेल तारावर पोलिसांची धाड; तीन महिलांची सुटका

जळगाव, (प्रतिनिधी) : शहराच्या एमआयडीसी परिसरातील एच सेक्टरमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. बुधवारी सायंकाळी ‘हॉटेल तारा’ येथे टाकण्यात आलेल्या या छाप्यात, पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी हॉटेलचा मालक आणि दोन ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या सूचनेनुसार, मानव तस्करी प्रतिबंधक पथकाने (AHTU) ही कारवाई केली. पोलिसांनी एक बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पाठवला. त्याने खोलीत पोहोचल्यानंतर ठरलेल्या संकेतानुसार दोन वेळा लाईट बंद-चालू केला. हा संकेत मिळताच पोलिसांनी तात्काळ हॉटेलवर छापा टाकला आणि तिथून तीन पीडित महिलांची सुटका केली.

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या या अनैतिक आणि बेकायदेशीर गतिविधीवर अंकुश लावण्यासाठी पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पीडित महिलांचे समुपदेशन सुरू करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये हॉटेल मालक आणि दोन ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या चौकशीतून यामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि गृह उपअधीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये प्रभारी अधिकारी योगिता नारखेडे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर, सहाय्यक फौजदार संजय हिवरकर, विठ्ठल फुसे, रवींद्र गायकवाड, निलिमा सुशीर, हवालदार दीपक पाटील, भूषण कोल्हे, मनीषा पाटील आणि वाहिदा तडवी यांचा समावेश होता. एमआयडीसी पोलीस ठाण्यात यासंबंधी पुढील तपास वेगाने सुरू आहे.
पोलिसांनी केलेल्या या प्रभावी कारवाईमुळे, शहरातील अशा अनैतिक व्यवसायांवर आळा घालण्याच्या प्रयत्नांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

Tags: #jalgaon_cityCrime
Next Post
एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई: मोटार सायकल चोर गजाआड, चोरीची ऍक्टिव्हा जप्त

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई: मोटार सायकल चोर गजाआड, चोरीची ऍक्टिव्हा जप्त

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group