जळगाव, (प्रतिनिधी) : जागतिक फोटोग्राफी दिनाचे औचित्य साधून प्रेस फोटोग्राफर फाउंडेशन, जळगावने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले आणि त्यानंतर आर्थिक साक्षरतेवर एक महत्त्वपूर्ण व्याख्यान पार पडले. बढे कॅपिटलचे संचालक ज्ञानेश्वर बढे यांनी हे व्याख्यान दिले.
फोटोग्राफर पैसे कमवतात, पण योग्य गुंतवणुकीबद्दल त्यांना फारशी माहिती नसते. याच उद्देशाने, फोटोग्राफर बांधवांना आर्थिक गुंतवणुकीबद्दल योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ज्ञानेश्वर बढे, फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप वानखेडे, आणि भैरवी पलांडे-वाघ उपस्थित होते. भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती देऊन फोटोग्राफर्सना शुभेच्छा दिल्या.
आर्ट गॅलरी, म्युझियमसाठी शासन स्तरावर मदतीचे आश्वासन.. -जिल्हाधिकारी
यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की फोटोग्राफर खूप मेहनत घेतात. त्यांनी जळगावमध्ये आर्ट गॅलरी आणि सुंदर म्युझियम असावे अशी इच्छा व्यक्त केली. तसेच, शासकीय स्तरावर काही मदत लागल्यास ती नक्कीच दिली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. जळगावच्या विकासाचा चेहरा जगापुढे मांडणाऱ्या सर्व छायाचित्रकारांनी जिल्ह्याचं सौंदर्य जास्तीत जास्त प्रकर्षाने मांडावे, आपण काढलेलं सुंदर छायाचित्र मला वैयक्तिक पाठवा मी ते फेसबुक पेजवर प्रकाशित करेल आणि जिल्ह्याच्या प्रगतीला आपण हातभार लावूया, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला वृत्तपत्र आणि व्यावसायिक फोटोग्राफर यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे हेमंत पाटील जळगावकर, सचिन पाटील, जुगल पाटील, पांडुरंग महाले, अरुण इंगळे, भूषण हंसकर आणि भूषण पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे सचिव अभिजीत पाटील यांनी केले तर सुमित देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.
उपस्थित मान्यवर..
कार्यक्रमाला चंद्रशेखर नेवे, गोकुळ सोनार, नितीन सोनवणे, अतुल वडनेरे, शैलेश पाटील, जयंत चौधरी, सुरेश सानप, राजू माळी, वैभव धर्माधिकारी, प्रकाश मुळे, नितीन थोरात, रुपेश महाजन, उदय बडगुजर, विजय बारी, संदीप याज्ञिक, शब्बीर सय्यद, अभिषेक मकासरे, राजू जुमनाके, उमेश चौधरी, प्रवीण गायकवाड, निखिल सोनार, बंटी बारी, चित्रनिश पाटील, विनोद बारी, रोशन पवार, किशोर पाटील, वाल्मिक जोशी, नितीन नांदुरकर, सचिन गोसावी, अयाज मोहसिन, सतीश सैदाणे, विक्रम कापडणे, नाजनीन शेख, चेतन वाणी, सुनील भोळे, जकी अहमद, निखिल वाणी, काशिनाथ चव्हाण, योगेश चौधरी, संदीप महाले, विकास पाथरे, दीपक सपकाळे, संदीप होले आणि कल्पेश वाणी यांसह वृत्तपत्र, व्यावसायिक फोटोग्राफर, प्रादेशिक आणि यूट्यूब चॅनलचे प्रतिनिधी मोठ्या संख्येत उपस्थित होते.










