जळगाव, (प्रतिनिधी) : शिवसेना प्रणित युवासेनेच्या ‘निष्ठा २०२५’ दहीहंडीचा उत्सव शहरातील सतरा मजली इमारतीसमोर मोठ्या उत्साहात पार पडला. युवासेनेने सलग तिसऱ्या वर्षी या दहीहंडीचे आयोजन केले होते.
तरुण कुढापा मंडळाने रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी ही दहीहंडी फोडली. यश खोंडे (गोविंदा) याने दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला. दरम्यान युवा कार्यकर्त्यांसह शहरातील तरुणांनी जोरदार जल्लोष केला.
यावेळी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हा संघटक करण पवार, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, माजी महापौर राखी सोनवणे, माजी नगरसेविका ज्योती तायडे, युवासेना विस्तारक प्रवीण चव्हाण, भूषण मुलाने आणि सपना चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा उत्सव यशस्वी करण्यासाठी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख पीयुष गांधी, विशाल वाणी, अमित जगताप, हर्षल मुंडे, अंकित कासार, सौरभ चौधरी, गजेंद्र कोळी, आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.