जळगाव, (प्रतिनिधी) : येथील रहिवासी असलेले आणि हिताची अस्मेटो प्रा. ली. येथे कार्यरत असलेले रामराव सीताराम तायडे यांना राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्था यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय कामगार भूषण पुरस्कार २०२५ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
हा गौरवपूर्ण पुरस्कार सोहळा आज, २७ जुलै रोजी कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. माजी मंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते, तसेच आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, डॉ. रविकांत पाटील, ब्रह्मकुमारी सुनंदा दीदी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. तायडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.