• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे सेवेला सुरुवात

धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी चाळीसगाव येथून दाखविला हिरवा झेंडा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 14, 2021
in जळगाव जिल्हा
0
चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे सेवेला सुरुवात

जळगाव, दि. 14 – चाळीसगाव-धुळे रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेमू रेल्वे सेवेला आजपासून प्रारंभ झाला. केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दादाराव पाटील दानवे यांनी नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे, तर राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमीन विकास व विशेष साहाय्य राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी चाळीसगाव रेल्वे स्थानक येथे मेमू रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला.

याशिवाय खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार उन्मेश पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. चाळीसगाव येथे झालेल्या कार्यक्रमास धुळेचे महापौर प्रदीप कर्पे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, चाळीसगावच्या नगराध्यक्षा आशालता चव्हाण, रेल्वेचे विभागीय प्रबंधक एस. एस. केडिया, सहाय्यक प्रबंधक युवराज पाटील, वरीष्ठ सुरक्षा अधिकारी श्री. गुरव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. दानवे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रशासन प्रवाशांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी रेल्वे विभागाने विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. नवीन रेल्वे सेवा, मार्ग सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एकत्रितपणे काम करण्यात येत आहेत.

महसूल राज्यमंत्री श्री. सत्तार म्हणाले, मराठवाडा आणि खानदेशला जोडणारा महत्वाकांक्षी सोलापूर- जळगाव रेल्वे मार्ग कार्यान्वित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. रेल्वे सेवा व अन्य मार्गांसाठी आपण राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे दीर्घकालावधीनंतर सुरू झाली. यामुळे प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. रेल्वेला फुलांनी सजविण्यात आले होते. या नवीन गाडीच्या स्वागतासाठी चाळीसगावसह धुळेकरांनी गर्दी केली होती. मेमू रेल्वेला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर राज्यमंत्री श्री. सत्तार यांच्यासह रेल्वेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी चाळीसगावपासून भोरस रेल्वेस्थानकापर्यंत प्रवास केला.

Next Post
मारवड गोवर्धनच्या शिष्टमंडळाने घेतली पालकमंत्री यांची भेट

मारवड गोवर्धनच्या शिष्टमंडळाने घेतली पालकमंत्री यांची भेट

ताज्या बातम्या

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
मनोरंजन

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
चोपडा पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ७ किलो गांजासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक
गुन्हे

चोपडा पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ७ किलो गांजासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

July 27, 2026
‘बोलावा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना
जळगाव जिल्हा

‘बोलावा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना

July 27, 2026
वंजारी युवा संघटनेतर्फे जळगावात २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दिमाखात संपन्न; ११० विद्यार्थ्यांचा गौरव
जळगाव जिल्हा

वंजारी युवा संघटनेतर्फे जळगावात २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दिमाखात संपन्न; ११० विद्यार्थ्यांचा गौरव

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
जळगाव जिल्हा

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात
शैक्षणिक

आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add