• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाचोरा हादरले! बसस्थानकासमोर तरुणावर १२ गोळ्या झाडून हत्या, शहरात तणाव

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 4, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
पाचोरा हादरले! बसस्थानकासमोर तरुणावर १२ गोळ्या झाडून हत्या, शहरात तणाव

पाचोरा, (प्रतिनिधी) : शहरात एका थरारक घटनेने खळबळ उडाली आहे. पाचोरा बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अज्ञात व्यक्तींनी आकाश कैलास मोरे (वय २६, रा. छत्रपती शिवाजीनगर, पाचोरा) या तरुणावर आज सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास सिनेस्टाईल गोळीबार करत त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण पाचोरा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्राथमिक माहितीनुसार तब्बल १० ते १२ गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, ४ जुलै रोजी संध्याकाळी दोन संशयित मारेकरी दुचाकीवरून आले. त्यांनी बसस्थानकाजवळ असलेल्या आकाश मोरेला लक्ष्य करत गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर ते घटनास्थळावरून तात्काळ पसार झाले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात एकच धावपळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने परिसर सील करून पंचनामा केला आणि गंभीर जखमी झालेल्या आकाश मोरेला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी शहरात नाकाबंदी सुरू केली असून, विविध पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी सुरू आहे, जेणेकरून मारेकऱ्यांचा सुगावा लागेल आणि हत्येमागील नेमकं कारण काय, हे समोर येईल. पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक लॅबला या घटनेची माहिती दिल्याने फॉरेन्सिक व्हॅनही घटनास्थळी दाखल झाली आहे. पाचोरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Tags: #pachoraCrime
Next Post
पाचोरा गोळीबार प्रकरण: दुचाकीच्या वादातून तरुणाची हत्या; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

पाचोरा गोळीबार प्रकरण: दुचाकीच्या वादातून तरुणाची हत्या; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add