• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मोटारसायकल चोरीतील सराईत गुन्हेगार जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 3, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
मोटारसायकल चोरीतील सराईत गुन्हेगार जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात धुळे जिल्ह्यातील एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्यासोबत त्याच्या एका साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले असून, यामुळे मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पथके तयार केली होती.

गुरुवार, ३ जुलै २०२५ रोजी, पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, शेख इमरान शेख रफिक (रा. ग्रीन पार्क कॉलनी, भडगाव, मूळ रा. अंबिकानगर, धुळे) आणि त्याचा एक साथीदार भडगाव परिसरात मोटारसायकल चोरी करत आहेत. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी सापळा रचून शेख इमरान आणि त्याचा साथीदार शेख अकिल शेख शफिक (रा. जलाली मोहल्ला, भडगाव) यांना पाचोरा शहरातून अटक केली.

पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत, आरोपींनी भडगाव शहरातील विजय हॉटेलसमोरून आणि खोल गल्लीतील सलूनसमोरून अशा दोन ठिकाणांहून प्रत्येकी एक मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. भडगाव पोलिस ठाण्यात या चोरीसंदर्भात गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी शेख इमरान शेख रफिक याच्याकडे आणखी एक काळ्या रंगाची मोपेड मोटारसायकल असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, त्याच्यावर धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी आणि मालमत्तेसंबंधीचे गुन्हे दाखल असल्याचीही माहिती समोर आली आहे. पुढील कारवाईसाठी दोन्ही आरोपींना भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पो.हे.कॉ. लक्ष्मण पाटील, पो.हे.कॉ. संदीप पाटील, पो.ना. राहुल पाटील, पो.कॉ. जितेंद्र पाटील आणि पो.कॉ. भूषण पाटील यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Tags: Crime
Next Post
जळगावात कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

जळगावात कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

ताज्या बातम्या

जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद
गुन्हे

जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद

June 30, 2026
‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश
जळगाव जिल्हा

‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश

June 30, 2026
तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक
जळगाव जिल्हा

तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य
क्रिडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 30, 2026
डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव
जळगाव जिल्हा

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

June 30, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
जळगाव जिल्हा

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

June 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group